Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News : फळपीक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक; पिक विम्याच्या जिल्हा प्रतिनिधीला कार्यालयातच डांबले

Amravati News : लोकविकास शेतकरी संघटनेमार्फत अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांनी एकत्र या ठिकाणी पीक विम्याच्या जिल्हा प्रतिनिधीला बोलावलं

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: फळ पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा उतरविला आहे. अर्थात नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई शेतकऱ्याला मिळेल. मात्र (Amravati) अमरावती जिल्ह्यात संत्र्याचे मोठे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना (Farmer) भरपाई मिळू शकलेली नाही. यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी पीक विम्याच्या प्रतिनिधीलाच ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फळ पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक संत्र्याच नुकसान झाले असून शेतकऱ्यांना पिक विमा मिळणे अपेक्षित होतं. मात्र दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे लोकविकास शेतकरी संघटनेमार्फत अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांनी एकत्र या ठिकाणी (Crop Insurance) पीक विम्याच्या जिल्हा प्रतिनिधीला बोलावलं. शेतकऱ्यांनी आक्रमक होत पिक विम्याच्या जिल्हा प्रतिनिधीला या ठिकाणी दोन तासापेक्षा जास्त काळ डांबून ठेवलं, 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विम्याची रक्कम मिळावी 

तीन हजार १५६ शेतकऱ्यांना फळपीकाचा १० कोटी ७१ लाख रुपयांचा फळ पिक विमा मंजूर झाला आहे. मात्र तो अजुनपर्यंत मिळाला नसल्याने फळ पिक विमा मिळणार नाही; तोपर्यंत जिल्हा कृषी अधिकाऱ्याला कार्यालयातून व पिक विम्याच्या जिल्हा प्रतिनिधीला कार्यालयाच्या बाहेर जाऊ देणार नाही. अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. दरम्यान यावेळी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; पत्रात गर्भलिंगनिदान प्रकरणात रुपाली चाकणककरांचे नाव, खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT