Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News : पंचनामे न करताच खोट्या याद्या; खरे कांदा उत्पादक शेतकरी नुकसानीच्या अनुदानापासून वंचित

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदाची लागवड करण्यात येते. यंदा देखील कांदा लागवड करण्यात आली होती

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: उन्हाळी लागवड केलेल्या कांद्याचे अति पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला असून याची भरपाई मिळणे अपेक्षित आहे. मात्र खरा कांदा उत्पादक शेतकरी नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहिल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात समोर आला आहे. 

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदाची लागवड करण्यात येते. यंदा देखील कांदा लागवड करण्यात आली होती. मात्र यावर्षी उन्हाळी कांदाचे (Onion Crop) अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले होते. संपूर्ण कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. मात्र प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे कोणत्याही प्रकारे पंचनामे करण्यात आले नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. 

यादीत घोळ असल्याचा आरोप 

पंचनामे न करताच पात्र लाभार्थ्यांना वगळून कोरडवाहू शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या पात्र लाभार्य्थांच्या यादित समाविष्ठ करण्यात आले आहेत. यामुळे सदरच्या यादीत प्रचंड घोळ झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सात दिवसात संपुर्ण चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी तालूक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार अंजनगाव सुर्जी यांना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

SCROLL FOR NEXT