अकोल्यात पावसामुळे सोयाबीन भिजले; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान अॅड. जयेश गावंडे ...
ऍग्रो वन

अकोल्यात पावसामुळे सोयाबीन भिजले; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्ह्यात रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ठिकठिकाणी साठवून ठेवलेली सोयाबीनची सुडी भिजली आहे. वेचणीला आलेला कापूसही देखील ओला झाला आहे. अकोला जिल्ह्यात अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर अशा सर्वच तालुक्याला रात्री पावसाने चांगलेच झोडपले आहे.

हे देखील पहा-

अकोल्यातील दहिगाव गावंडे परिसरात गावातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून शेतात गंजी करून ठेवली होती. रात्रभर आलेल्या पावसामुळे सोयाबीन ओले झाले आहे. याचा फटका या पिकाला बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक भागात वेगाचा वारा, विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सध्या सर्वत्र सोयाबीन सोंगणी आणि मळणीचा हंगाम जोरावर सुरू आहे. कापूस देखील वेचणीला आलेला आहे. अशातच हा कालच्या झालेल्या पाऊसाने मोठी अडचण तयार झाली आहे. सततच्या पावसाने सोंगणी केलेल्या सोयाबीनच्या शेंगांमधून कोंब निघण्याची भीती शेतकऱ्यांनमध्ये निर्माण झाली आहे.

Edited By- Digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT