Kerala: पावसाचा हाहाकार, 18 जणांचा मृत्यू

केरळच्या संपूर्ण राज्यात मुसळधार पावसामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे
Kerala: पावसाचा हाहाकार, 18 जणांचा मृत्यू
Kerala: पावसाचा हाहाकार, 18 जणांचा मृत्यू Saam Tv
Published On

वृत्तसंस्था : केरळच्या संपूर्ण राज्यात मुसळधार पावसामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता देखील झाले आहेत. परतीच्या पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. भूस्खलनाने अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत.

केरळच्या ५ जिल्ह्यांत २ दिवस रेड अलर्ट तर ७ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात गंभीर पूरस्थिती बघता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लष्कराला पाचारण करण्याची विनंती केली आहे. अनेक भागांत लष्कराच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आले आहेत. केरळमध्ये मुसळधार पावसाने अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता केरळ किनारपट्टीवर पोहोचले आहे. यामुळे केरळात पावसाचा जोर वाढला आहे. सध्या दक्षिण आणि मध्य केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्रिवेंद्रम, कोल्लम, पदानमटिट्टा, कोट्टायम, इडुक्की या जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्टायम जिल्ह्यातच आतापर्यंत ६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण अद्याप बेपत्ता आहेत.

कोट्टयम, इडुकी आणि पथनमथिट्टा जिल्ह्यांत डोंगर परिसरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याअगोदर २०१८ आणि २०१९ मध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. २०१८ मध्ये आलेल्या पुरामुळे केरळात मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. त्यावेळेस जवळपास ४५० हून अधिक लोकांनी जीव गमावलेला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजयन यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत, पूरस्थितीचा सामना करण्याकरिता स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

Kerala: पावसाचा हाहाकार, 18 जणांचा मृत्यू
Singhu border: मिळालेल्या लोंबकळत्या मृतदेह प्रकरणी चौघांना अटक

तसेच राज्यातील सर्व पर्यटन स्थळे पुढील सुचनेपर्यंत बंद ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. केरळात पुरामुळे परिस्थिती अत्यंत भयानक झाली आहे. रविवारी आणि सोमवारी संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अनेक भागांत मदत आणि बचावकार्य करण्यास सुरवात करण्यात आली आहे. लष्कराची एक तुकडी कोट्टायममध्ये तैनात आहे. तर दुसरी तुकडी त्रिवेंद्रममध्ये तैनात करण्यात आली आहे.

एनडीआरएफची ७ पथकांनीही मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. एअर फोर्सला देखील मदत कार्यासाठी तयार राहण्याच्या सुचना देण्यात आले आहेत. दरम्यान केरळ मधील प्रसिद्ध शबरीमला मंदिर आजपासून २१ ऑक्टोबरपर्यंत भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे. अयप्पा देवाच्या दर्शनाकरिता देशभरातून हजारो भक्त मंदिरात येऊ शकतात. त्यात पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com