Akola News Saam tv
ऍग्रो वन

Akola News : अवकाळी पावसाच्या तडाख्याने पिके भुईसपाट; अकोल्याच्या हिवरखेड परिसरात नुकसान

Akola News : पावसामुळे पानपिंपरी झाडातून गळालेली असून सदर पानपिंपरी कोरड्या जागेत वाळविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहे

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 
अकोला
: राज्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. यात अकोला (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड परिसरातील सर्वच गावांमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या (Rain) तडाख्याने अनेक पिके भुईसपाट झाली आहेत. पानपिंपरी, कापूस, कांदा यासह विविध पिके घेणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Breaking Marathi News)

अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊसाने हाहाकार घातला आहे. यामुळे शेतातील पिके भुईसपाट झाले आहेत. तर दुसरीकडे हिवरखेडकडून सातपुडा पर्वताच्या भागाकडे असणाऱ्या परिसरात ओलीताची शेती असल्यामुळे अनेक शेतकरी बांधव बहुगुणी आणि औषधी गुणधर्म असलेल्या पानपिंपरीची लागवड प्रामुख्याने करतात. त्यामुळे (Farmer) शेकडो एकरवर पानपिंपरी लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. तर या पावसामुळे पानपिंपरी झाडातून गळालेली असून सदर पानपिंपरी कोरड्या जागेत वाळविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भरपाईची मागणी 

अवकाळी पावसामुळे पानपिंपरीचे पीक गळालेले असून त्याला बुरशी लागलेली आहे. त्यामुळे पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान हजारांमध्ये नव्हे तर लक्षावधी रुपयांमध्ये आहे. याची जाणीव शासनाला असणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत जाहीर करून ती तातडीने वितरित करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT