Tomato Price Saam tv
ऍग्रो वन

Tomato Price : ट्रान्सपोर्टसाठी खिशातून पैसे; दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपुढे अडचण

Akola News : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्या संदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला बाजारात आवक वाढल्याने टोमॅटोचा बाजारभाव घसरला आहे. शेतकऱ्याच्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : मार्केटमध्ये टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी मोठी अडचण झाली आहे. आधी शेतमाल नव्हता तर भाव होता. आता शेतमाल आहे, तर टोमॅटोला भाव नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ट्रान्सपोर्टसाठी शेतकऱ्याला खिशातून पैसे मोजावे लागत आहेत. परिणामी अकोल्यातल्या टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्या संदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला बाजारात आवक वाढल्याने टोमॅटोचा बाजारभाव घसरला आहे. शेतकऱ्याच्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. उन्हाळ्याचा चांगला भाव मिळत असल्याच्या आशेने लागवड करण्यात आली होती. मात्र प्रति किलोमागे अडीच ते पाच रुपयांपर्यंत भाव मिळत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

२५ एकरात टोमॅटो लागवड 

अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या दानापूर येथील संजय येऊल या शेतकऱ्याला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. संजय येऊल यांनी जवळपास २५ एकरात मोठा टोमॉटोचा प्लांट उभा केला. मात्र त्यांच्या टोमॉटोला केवळ अडीच रुपयांपासून भाव मिळतो आहे. मागील हंगामात ८०० ते ९०० रुपययांपर्यंत टोमॅटोला भाव मिळाला होता. तर यंदा ८० ते ९० रूपांपर्यंत कॅरेटनुसार टोमॅटोला भाव मिळतो आहे. 

खर्च निघणेही झाले कठीण 

एकंदरीत गेल्या काळात शेतमाल नव्हता तर टोमॅटोला भाव होता. आता शेतमाल आहे मात्र भाव नाही; अशी परिस्थिती या शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे संजय येऊल यांना लागणारा खर्च देखील निघणं कठीण झाले आहे. टोमॅटोच्या ट्रान्सपोर्टसाठी घरातून पैसे त्यांना मोजावे लागत आहेत. अर्थात टोमॅटो उत्पादनातून लागलेला खर्च देखील निघणे आता कठीण झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

SCROLL FOR NEXT