Akola News Saam tv
ऍग्रो वन

Akola News: रस्त्यावर फेकला कांदा; कांद्याला पन्नास हजार रुपये अनुदानाची मागणी

रस्त्यावर फेकला कांदा; कांद्याला पन्नास हजार रुपये अनुदानाची मागणी

जयेश गावंडे

अकोला : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे; या प्रमुख मागणीसाठी आज (Akola) अकोल्यातील वाडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर कांदा (Onion) फेकून सरकारचा निषेध नोंदवला. (Breaking Marathi News)

अकोला जिल्हयात यावर्षी अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच बागायतदार व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून या नुकसानीतून बाहेर निघणे अशक्य झाले आहे. सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबाग धारक शेतकरी तसेच बागायतदार व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

सरकारचा केला निषेध

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज आंदोलन करत कांदा उत्‍पादक शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याची मागणी केली आहे. तसेच रस्‍त्‍यावर कांदा फेकून सरकारच्‍या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ; तुमच्या शहरातील दर काय? जाणून घ्या

Nutrition Tips: जाणून घ्या,नवजात बाळाच्या विकासासाठी योग्य आहार

Exit Poll Maharashtra : कागलमध्ये समरजित घाटगे मारणार बाजी? पाहा Exit Poll

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT