Bogus Seeds Saam tv
ऍग्रो वन

Bogus Seeds : बियाणे लागवड पण उगवण नाही; बोगस बियाणांनी शेतकरी हैराण, दुबार पेरणीची वेळ

Akola News : अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात शेकडो एकरातील सोयाबीन आणि तुरीचे बियाणे लागवड करून उगवलंच नाही. बनावट बियाण्यांच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी बियाणे खरेदी करत असतो. मात्र यात बनावट बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असते. अशाच प्रकारे अकोल्यात बनावट बियाण्यांमूले फसवणूक झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीत मोठी वाढ झाली असून लागवड केलेल्या बियाणांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. 

बनावट बियाणे विक्रीचे रॅकेट सक्रिय झाल्याचे अकोल्यातील वाढत्या तक्रारींवरून पाहण्यास मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात शेकडो एकरातील सोयाबीन आणि तुरीचे बियाणे लागवड करून उगवलंच नाही. बनावट बियाण्यांच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. यामुळे नवीन बियाणे खरेदी करावी लागणार आहे. 

बियाणे लागवड केल्यानंतर उगविले नाही 

पातूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सारस ३३५ या कंपनीचे सोयाबीन बियाणं लागवड केल होत. अनेकांनी २० ते २१ जून दरम्यान शेतात पेरणी केली. अनेक दिवस उलटले, पाऊस चांगला झाला. मात्र, त्यांच्या शेतातलं बियाणं काही उगवल नाही. यात बोगस बियाणे असल्याची शक्यता असून कृषी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषी विभागाकडून पाहणी 
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर आता कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर पोचला आहे. याबाबत पंचनामे सुरु केले असून सारस ३३५ कंपनीचे सोयाबीन बियाणं देखील ताब्यात घेत प्रयोग शाळेत तपसणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केला जाईल असा कृषी अधिकार्‍यांनी सांगितलं. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT