Akola News Saam tv
ऍग्रो वन

नोकरीचा नाद सोडला; फुलांची शेती फुलवत झाला लखपती

उच्च शिक्षित तरूणाची शेतीत कमाल; फुलातून फुलवले आयुष्य, अनेकांना दिला रोजगार

जयेश गावंडे

अकोला : बीएड पर्यंतच शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या मागे न धावता (Akola) अकोला जिल्ह्यातील पातूर (Patur) शहरातील निलेश फुलारी या तरुणाने वडिलोपार्जित फुलशेती फुलवण्याचा ध्यास घेतला. या फुल शेतीतून निलेश दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळवतोय. आता निलेशने फुल शेतीतून आपले सर्व स्वप्न पूर्ण केले. स्वतःचे घर, चारचाकी वाहन यासह एक दुकान उभ केले. इतकेच नाही तर अनेकांना रोजगारही दिला आहे. (Letest Marathi News)

अकोला जिल्ह्यातील पातूरातील रहिवासी असलेले (Farmer) सुरेश फुलारी यांच्याकड़े दहा एकरवर शेती आहे. या शेतीमध्ये सुरुवातीला फुलारी यांनी कापूस, सोयाबीन, तूर, मुंग, उडीद या सारखे पारंपारिक पिके घेतली. मात्र या पिकातून हवे तसे उत्पन्न हाती येत नव्हते. त्यानंतर या पारंपारिक पिकांना फाटा देत त्यांनी फुल शेती निवडली.

१९९५ पासून फुल शेती

सुमारे १९९५ पासून त्यांनी फुल शेतीचा मार्ग निवडला. दरम्यान, कालांतराने सुरेश फुलारी यांच्या मुलाचे म्हणजेचे निलेशने सन २०१२ मध्ये बीएडचे शिक्षण (Education) पूर्ण केले. तरीही निलेश नोकरी लागत नव्हती. अखेर निलेशने नोकरीच्या मागे न धावता वडिलोपार्जित फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. आता निलेश फुलशेतीतून उंच भरारी घेतोय. आज फुल शेतीत गुलाब, निशिगंध, लिली, झेंडू, चायनीज गुलाब, गिलाडी यासारखी फुलांची शेती करत आहे.

पगारापेक्षा अधिक उत्‍पन्‍न

दरम्यान, उच्च शिक्षित होऊन अनेक युवक आजही नोकरीच्या शोधात आहेत. बी. एड् केलेले अनेक तरुण शेती विकून शिक्षकाची नोकरी स्वीकारतात. पण निलेशने बीएडचे शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी पैसा न देता शेतीत आपल्या शिक्षणाचा फायदा घेत नोकरीपेक्षाही भरगोस उत्पन्न घेतो आहे. हे आजच्या तरुणपिढीला नवी प्रेरणा म्हणावी लागणार. निलेशलाही या सीजीनमध्ये भरगोस उत्पन्न मिळाले आहे. फुलांचा बाजार अकोल्यातच असल्याने निर्यातीला सोयीस्कर जातेय. खर्चही कमी लागतो. निलेशला दरवर्षी खर्च वजा निव्वळ नफा दहा ते पंधरा लाख एवढा होतो. त्यामुळे नोकरी करून पगारापेक्षा अधिक उत्पन्न आता निलेश फुलशेतीतून घेतो. दरम्यान, निलेश दर वर्षाला तीस लाखांच्या जवळपास उलाढाल करत आहे. तर खुद्द १५ लाखांच्या घरात कमवातोय.

अनेकांना दिला रोजगार

निलेशने फुल शेतीतून फुले तोडण्यासाठी महिलांना आणि फुले पोहचवण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. आता गावातच महिला आणि तरुणांना रोजगार मिळाल्याने मजूर वर्ग आनंदीत आहेत. तर शेतात रखवाली म्हणून दोन कुटुंबांना वेगवेगळे शेतात निवारा देत रोजगारही दिलाय. आज निलेश याच्याकड दहा जणांची काम करणाऱ्यांची संख्या आहेय.

अशी घेतली फुलांच्या झाडांची काळजी

निलेशने फुलांच्या झाडांचे व्यवस्थापन करण्यासाठी दर आठवड्यातून फवारणी केली. सोबतच शेतामध्ये कधीकाळी विज न राहायची, त्यामुळे झाडांना पाणी देण्यासाठी विजेची प्रतीक्षा करावी लागत असायची. यावर उपाय म्हणून शेतात सौर ऊर्जा प्रकल्प उभा केलाय, विहिरीतून फुलांच्या झाडांना पाणी दिल्या जाते. तसेच जैविक आणि रासायनिक खतांचा वापर करून झाडांची काळजी घेतली आहे.

अनेक शहरात होतोय फुलांचा सप्लाय

निलेशने एक एकरमध्ये गुलाब, १० एकरात झेंडू, अर्धा एकरात निशीगंध, अर्धा एकरमध्ये गिलाडी, २ एकरात शेवतीसह उर्वरित शेतात लिली, चायनीज गुलाब यासह आधी फुलांची शेती करत आहे. त्याचे फुले बुलडाणा जिल्ह्यतील शेगाव, मूर्तिजापुर, वाशिम जिल्ह्यातील कारंजा, अकोला बाजार पेठ, छोटे किरकोळ दूकानदारांना अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर, अकोट इथे फुले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT