ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फ्रिजमध्ये भाज्या ठेवूनही त्या लवकर कोमेजतात, पिवळ्या पडतात ? यासाठी चुकीची साठवण पद्धत कारणीभूत असू शकते. तर जाणून घ्या भाज्या फ्रेश राहण्यासाठीच्या सोप्या टिप्स.
भाज्या प्लास्टिकमध्ये ठेवल्यास भाज्यांवर ओलावा साठतो आणि त्या लवकर सडतात. असे न करता भाज्या पेपरमध्ये गुंडाळून ठेवल्यास त्या अधिक दिवस ताज्या राहतात.
फ्रिजचे तापमान 3 ते 5 डिग्री सेल्सियस मध्ये ठेवा. हे तापमान भाज्यांसाठी परफेक्ट असून या तापमानात भाज्या खराब न होता जास्त काळ टिकतात.
पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या भाज्या धुवू नका.फक्त किचन टॉवेलमध्ये गुंडाळून एअरटाइट बॉक्समध्ये ठेवा.
भाज्यांना हवा मिळाली पाहिजे. त्यामुळे भाज्या ह्या नेहमी छिद्र असलेल्या पिशव्यांमध्ये ठेवल्या तर ओलावा कमी होतो आणि भाज्या ताज्या राहतात.
भाज्यांसाठी असणाऱ्या खास ‘क्रिस्पर बॉक्स’ मध्ये ठेवले तर त्यांची आर्द्रता संतुलित राहते आणि भाज्या जास्त काळ टिकतात.
टॉमेटो आणि बटाटे हे थंडीत आपली चव व टेक्स्चर गमावतात त्यामुळे त्यांना रूम टेंपरेचरवर ठेवल्यास ते अधिक दिवस चांगले राहतात.
काकडी, ढोबळी मिरची, भेंडी या भाज्यांना पाणी सुटते म्हणून यांसारख्या भाज्यांच्या बॉक्समध्ये एक कोरडा टिशू ठेवावा. टिशू ओलावा शोषून घेवून भाज्या फ्रेश राहतील.
फ्रिजमध्ये जास्त सामान ठेवल्यास हवा फिरती राहत नाही.यामुळे भाज्या लवकर खराब होतात. भाज्या चांगल्या आणि दिर्घकाळ टिकण्यासाठी फ्रिजमध्ये थोडी जागा मोकळी ठेवा.