ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कांदा चिरताना कांद्यातील सफ्लर वायू हवेत मिसळतात. हवेत मिसळल्यामुळे त्याचा थेट संर्पक डोळ्यांशी होतो आणि त्यामुळे डोळ्यातून पाणी येऊ लागते.
कांदा चिरण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावा. कांद्याला थंडावा मिळाल्यावर सफ्लर वायू कमी सोडतो आणि डोळे पाणावत नाही.
कांदा चिरताना आजूबाजूला पाण्याचा संपर्क असेल तर कांद्यातील सफ्लर कण पाण्यात जातात आणि डोळे सुरक्षित राहतात.
धारदार सुरी वापरल्यास कांदा पटकन चिरला जातो. पण जर जुन्या सुरीचा वापर केल्यास कांदा कापताना जास्त वायू सुटतो आणि डोळे पाणावतात.
कांदा चिरताना जवळ मेणबत्ती लावल्यास सफ्लर वायू डोळ्यांपर्यंत न पोहचता मेणबत्तीच्या जळत्या भागाकडे जातो.
हा उपाय जुना असून असरदार आहे. तोंडात पाणी धरुन कांदा कापल्याने डोळ्यात पाणी येत नाही.
कांद्याच्या मुळाजवळ सफ्लर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे टोके कापून टाकल्यास त्रास कमी होतो.