ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कढई आणि घरातील भांडी नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटकी असावी असे प्रत्येक गृहिणीला वाटत असते. नैसर्गिक उपाय वापरल्याने भांडी चमकदार राहतात.
लिंबू अर्धा कापून त्यावर थोडं मीठ शिंपडून,तेलकट कढई किंवा भांड्यावर घासा. ५ मिनिटे तसेच ठेवा आणि पाण्याने धुवा. पहिल्या सारखी चमक परत मिळेल.
१ चमचा बेकिंग सोडा आणि थोडं पाणी मिक्स करा. ही तयार केलेली पेस्ट भांड्यांवर लावा आणि ब्रशने घासा. तेलकटपणा आणि डाग गायब होतील.
थोडं व्हिनेगर आणि कोमट पाणी एकत्र करुन त्यात भांडी १० मिनिटे भिजवून ठेवा. यानंतर स्वच्छ कपड्याने भांडी पुसा पुन्हा नवीनसारखी चमक दिसेल.
भात शिजवल्यानंतर उरलेलं पाणी भांडी घासण्यासाठी वापरा. हे भाताचे पाणी नैसर्गिक क्लिनर म्हणून वापरले जाते.
अॅल्युमिनियम भांडी काळवंडल्यास, त्यावर थोडं व्हिनेगर आणि बेकिंग सोडा शिंपडा आणि कोमट पाण्याने धुवा. डाग नाहीसे होतील.
वापरल्यानंतर भांडी लगेच धुवून टाका. तसेच आठवड्यातून एकदा बेकिंग सोडा वापरावा. भांड्यांची चमक दीर्घकाळ टिकेल.