ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गॅसवर सतत वापर, जास्त आचेवर स्वयंपाक आणि अन्न सांडल्यामुळे कुकरला काळपट थर चढतो. त्यामुळे कुकरची चमक जाते आणि काळपट दिसायसा लागतो.
एका भांड्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि १ लिंबाचा रस मिक्स करा. हे तयाक केलेली पेस्ट कुकरच्या काळपट भागावर लावा आणि १५ मिनिटे ठेवा.
१५ मिनिटानंतर हलक्या हाताने घासून घेवून धुवा. कुकर पुन्हा आधी सारखा चमकायला लागेल.
एक कप व्हिनेगरमध्ये २ चमचे मीठ टाका. त्यानंतर व्हिनेगर आणि मीठ कुकरमध्ये ओतून काही वेळ गरम करा. कुकर थंड झाल्यावर धुवा कुकरवरील डाग आणि काळपटपणा निघून जाईल.
थोडी टूथपेस्ट घ्या आणि ओल्या कपड्याने कुकरवर लावा. तुमचा कुकर त्वरित चमकू लागेल.
थोडे गरम पाणी आणि बेकिंग सोडा टाकून कुकर ५ मिनिटे उकळवा. जळलेले डाग सहजरीत्या निघून जातील.
आठवड्यातून एकदा कुकर कोमट साबणाच्या पाण्याने धुवा. यामुळे काळरटपणा साचत नाही आणि चमक कायम राहते.
कुकर धुतल्यावर लगेच कोरडा करा आणि तेलाचा थोडा लेप द्या. यामुळे कुकर दिर्घकाळ नवीन सारखा राहिल.