Lightning Strike
Lightning Strike Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike : अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा अवकाळी; जामखेड तालुक्यात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहमदनगर : राज्यातील काही भागात अजूनही अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दरम्यान (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जामखेड तालुक्यात रिमझिम पाऊस (Rain) झाला. या दरम्यान वीज पडून चार जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे. (Tajya Batmya)

हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अगोदरच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पुन्हा पावसाची शक्यता असल्याने (Farmer) शेतकरी चिंतेत सापडला असून शेतात असलेले पीक काढण्याच्या मार्गावर आहे. यात आता अहमदनगर जिल्ह्यातील (Jamkhed News) जामखेड तालुक्यात अवकाळीने हजेरी लावली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रिमझिम पावसात पडली वीज 

जामखेड तालुक्यातील अनेक गावांत रिमझिम पाऊसासह वादळी वारा सुटला होता. रीमझिम अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. तर जनावरांसह झाडावर देखील (Lightning Strike) वीज पडली असून यात २ गाई,१ बैल आणि १ वासरू यांच्यावर वीज पडल्याने मृत्यू झाला. वीज पडून मृत जनावरे व रिमझिम पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार गणेश माळी यांनी दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Car Accident: मुलगा बेदरकार, बाप जबाबदार! वडिलांनीच कार दिल्याची मुलाची कबुली; बापाला अटक, पबलाही टाळं

Mumbai Metro: मालाड स्थानकाचं नाव बदललं, आता 'मोतीलाल ओसवाल मालाड'च्या नावाने ओळखले जाणार हे मेट्रो स्थानक

IPL 2024 Qualifier 1 SRH vs KKR: अय्यर ऑन फायर; हैदराबादचं वर्चस्व मोडून काढलं, कोलकाता फायनलमध्ये

Maval Lok Sabha: निकालापूर्वीच मावळमध्ये महायुतीत खदखद, बारणे म्हणतात दादा आले पण 'पावर' नाही

Latur Gous Shaikh Motivatinal Story | पायाने पेपर लिहला! हात नसलेल्या या चॅम्पीयनचा पॅटर्नच वेगळा आहे.

SCROLL FOR NEXT