सोलापूर : सोलापुरातील बार्शी तालुक्यातील पिंपरी या गावात एकाच कुटुंबामध्ये शेतीवाटपावरून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरीतील बहाद्दूर पठाण यांनी त्यांच्याच कुटुंबातील ९ सदस्यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने वैराग पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता कलम 504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील पहा-
या प्रकरणात दादासाहेब पठाण यांनी बहाद्दूर पठाण आणि अन्य दोघांविरुद्ध हातामध्ये लोखंडी तलवार घेऊन दमदाटी दिल्याची फिर्याद दिल्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 504,506,34 आणि शस्त्र अधिनियम कलम 4,25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीवाटपावरून सुरु असणाऱ्या या कौटुंबिक वादामध्ये तलवारी दाखवण्यात येत असल्यामुळे पिंपरी परिसरामध्ये सध्या भीतीचे वातावरण बघायला मिळतं आहे. पुढील तपास पोलीस नाईक एम. जे. पाडुळे हे करत आहेत.
Edited By- Digambar jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.