Parineeti Chopra Hair Colour Photos
Parineeti ChopraSAAM TV

Parineeti Chopra: नवीन चित्रपटासाठी परिणीतीचा नवा लूक, केसांना कलर करत चाहत्यांना दिली बातमी

Parineeti Chopra Hair Colour Photos : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आता नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी तिने एक खास लूक केला आहे.
Published on

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्रामवर परिणीतीचे 44.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. परिणीती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या कामाबद्दल माहिती आणि आपले नवीन लूक ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच तिने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर तिच्या नव्या हेअर लूकचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. तिने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. परिणीतीने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले आहे. पहिल्या फोटोत परिणीतीने केसांना रंग देत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये परिणीती आपल्या केसांच्या नवीन लूक सोबत पोज करताना दिसत आहे.

परिणीतीने या फोटोंना एक खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं की, "नवीन चित्रपट, नवीन केस" यातून परिणीतीने नवीन चित्रपटाच्या तयारीला लागलेली पाहायला मिळत आहे. परिणीतीच्या पोस्टवर चाहत्यांनी भरपूर कमेंट्स केल्या आहेत. चाहते तिच्या नवीन चित्रपटासाठी खूप उत्सुक पाहायला मिळत आहेत. पोस्टला कमेंट्स करून चाहते परिणीतीला नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.

अलिकडेच परिणीती 'अमर सिंह चमकीला' या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटात तिने दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर केली होती. पंजाबच्या रॉकस्टारची कथा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Parineeti Chopra Hair Colour Photos
Pushpa 2 : 'पुष्पा'सोबत श्रद्धा नव्हे 'ही' अभिनेत्री लावणार ठुमके, आयटम साँगसाठी घेतलं 'इतकं' मानधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com