Buldhana News संजय जाधव
ऍग्रो वन

इंधन दरवाढीची झळ बांधावर; शेतकऱ्यांना फटका, मशागतीचा खर्च वाढला

मशागतीच्या खर्चात 25 टक्क्यांनी वाढ...

संजय जाधव

बुलढाणा - गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्यादरात (Diesel) सातत्याने वाढ होत आहे. 6 शेतात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला असून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अनेक कामे कली जातात. डिझेलच्या वाढत्या दरामुळे मशागतीच्या खर्चात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीचा थेट फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यात शेतीतील मशागतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. अलीकडच्या काळात अल्पभूधारक शेतकरीही ट्रॅक्टर वापरू लागले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची संख्या आहे. नांगर करण्यापासून ते पालाकुट्टी आणि विविध पिकात फवारणी करण्यासाठीही भाव वाढले आहेत. याचा सर्वाधिक शेतकऱ्यांना फटका बसता आहे.

हे देखील पहा -

शेती मशागतीसाठी पारंपारिक पद्धत जाऊन यांत्रिकीरणाकडे शेतकरी वर्ग वळला आहे. यामधून मजुरी व वेळेची बचत होऊ लागली आहे, असे असले तरी पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीमुळे शेतीचे आर्थिक गणित बिघडले आहे. इंधन भाववाढीची गुढी गगनाला भिडल्याने शेती व्यवसाय कसा करायचा अशी चिंता आता शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.

शेती यांत्रिकीकरणामुळे मजूर व वेळेची बचत होईल असे असतानाही वाढलेले डिझेल व पेट्रोलचे दर शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे ट्रॅक्टर व हार्वेस्टिंगच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. माल वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. यांत्रिकीकरणाची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पीक काढणीसाठी मजुरांची मदत घेणे गरजेचे आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस व इतर वस्तूंची महागाई वाढल्याने मजुरी दरातही भरमसाट वाढ झाली आहे. गहू पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने एकरी १० ते १५ क्विटंल उतारा येत आहे. गव्हाचे दर वाढले असले तरी देखील इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांना धक्का! ऋतुराज पाटील पराभवाच्या छायेत

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT