कोरोना व्हायरसच्या भीतीने देशभरात जागोजागी वॉश बेसिन लावलेयत.प्रत्येकजण वॉश बेसिनचा वापर करतोय.कुणालाही भेटायचं असेल तर आधी या वॉश बेसिनमध्ये स्वच्छ हात धुतले जातात.त्यानंतरच कुणाला भेटायचं असेल तर जाता येतं.एवढी काळजी रवांडा देशानं घेतलीय.कोरोना व्हायरस महामारी म्हणून जाहीर करण्यात आलाय.त्याच्याच धसक्याने सावधगिरी बाळगण्यात आलीय.
व्हिडीओ आता व्हायरल केला जातोय.सगळीकडेच वॉश बेसिनच दिसतायत.लोकही वॉश बेसिनचा वापर करतायत.पाण्यासाठी खाली छोटीशी टाकी ठेवलीय.पायाने पंप मारला की पाणीही येतं.त्यामुळे कुणीही या वॉश बेसिनचा वापर करू शकता.पण, हे सगळं नक्की कुठे सुरूय.याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं वाचा सविस्तर.
सध्या तरी रवांडामध्ये कोरोनाचा एकही पेशंट नाहीये.बाजूचा देश कॉन्गोमध्ये एक पेशंट आढळून आलाय.त्यामुळं खबरदारी म्हणून रवांडा देशानं सगळीकडेच स्वच्छतेसाठी वॉश बेसिन लावलेयत.लोकंही त्याचा वापर करतायत.त्यामुळे आपणही अशा प्रकारे स्वत:ची काळजी घ्यायला हवी.
web title : viral satya corona wash besin hands before getting rawanda africa
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.