Musical Instrument Manufacturers Selling Fruits in Sangli
Musical Instrument Manufacturers Selling Fruits in Sangli 
आज पाहा

लाॅकडाऊनने घोटला तंतूवाद्य निर्मात्यांचा गळा!

साम टीव्ही न्यूज .

मिरज : संगीत Music म्हटलं की वाद्यं Musical Instruments ही आलीच. संगीताच्या वाद्य ताफ्यातील तंतुवाद्य निर्मितीसाठी मिरज Miraj जगभर प्रसिद्ध आहे. मात्र मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती कला ही लोप पावण्याची भीती वाटू लागली आहे. कोरोनाच्या या महामारीत या तंतुवाद्य निर्मात्यांवर आज उपासमारी मुळे भाजीपाला विक्री करण्याची वेळ आली आहे. Musical Instruments Makers in Miraj Selling Fruits in Lock Down

मिरज हे तंतुवाद्य निर्मिती साठी जगभर प्रसिद्ध आहे. सतारमेकर कारागीरांनी बनवलेले दिलरुबा, सारंगी, बिन, विना ,तंबोरा, एकतारी भजनी मंडळाचे साहित्य याच बरोबर चर्म वाद्ये यांना देशाबरोबरच विदेशातही मोठी मागणी असते. तानपुऱ्या शिवाय  शास्त्रीय संगीत अधुरे आहे. तसेच वाद्य तयार करणाऱ्या या कारागिरांच्या शिवायही संगीत अधुरे आहे.

हे देखिल पहा

पहिल्या लॉक डाऊन मध्ये जवळील जमा पुंजी संपली तर दुसऱ्या लॉक डाऊन मध्ये  हाताला काम नसल्याने तंतुवाद्य कारागिरांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंब चालवण्यासाठी हातात कला असूनही सध्याच्या स्थितीत त्याचा काहीही उपयोग नसल्याने जगण्यासाठी भाजीपाला विक्री आणि अन्य व्यवसाय करण्याची वेळ आज या कारागिरांच्यावर आली आहे. Musical Instruments Makers in Miraj Selling Fruits in Lock Down

गेल्या लॉकडाऊन मध्ये आठ कारागिरांनी तंतुवाद्य निर्मिती व्यवसाय बंद करून दुसऱ्या व्यवसाय सुरू केला आहे. तर आषाढी - कार्तिकी वारी बंद झाल्याने २००  कारागीर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या ४०० ते ५०० कामगारांनी जगायचं कस हा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊन मुळे देश आणि विदेशात जाणारा  तीन ते चार कोटींचा माल प्रत्येक दुकानात पडून आहे. गावोगावी  पारायण, सप्ताह, मंदीरे बंद झाली आहेत. पंढरपूरला प्रत्येक वारीला तीन ते चार हजार भजनी आणि विणांची मागणी असे.  ती ही बंद झाली आहे. Musical Instruments Makers in Miraj Selling Fruits in Lock Down

मिरजेतील सतारमेकर घराण्याने २०० ते २२५ वर्षांची तंतुवाद्य निर्मितीची परंपरा जपली आहे. मात्र आज या कारागिरांच्या वर उपासमारीची वेळी आली आहे. त्यामुळे अन्य ते व्यवसायाकडे वळल्याने ही कला  लुप्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाने सतारमेकर  कारागिरांना  आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी जेष्ठ तंतुवाद्य निर्माते बाळासाहेब मिरजकर यांनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : छत्रपतींच्या गादीचा अपमान कोणी केला? बुधवारी कोल्हापुरात सगळं उघडं करणार : उदय सामंत

Sairat Movie: सुपरहिट सैराटला ८ वर्ष पूर्ण! आर्चीने शेअर केले कधीही न पाहिलेले खास फोटो

Sabudana Benefits: साबुदाणा आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा फायदे

Heat Wave Alert in Mumbai : नागरिकांनो सावधान! मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये येणार उष्णतेची लाट, आज आणि उद्या कसं असेल तापमान?

Food for Diabeties : मधुमेहाचे रुग्ण करु शकतात 'या' गोड पदार्थांच सेवन

SCROLL FOR NEXT