Parminder Kaur Working in Nanded Crematorium for Nine Years 
आज पाहा

मातृदिन विशेष - स्मशानभूमीत सरण रचणाऱ्या हिंमतवान मातेला सलाम!

संतोष जोशी

नांदेड : मृतदेह, स्मशानभूमी Crematorium नुसतं असा साधा उच्चार जरी कुणी उल्लेख केला तर अनेकांची छाती धडधडायला लागते. मात्र, याच स्मशानभूमीत राहून अत्यंत धाडसाने अंत्यसंस्काराचे संपुर्ण सोपस्कार पाडत गेल्या नऊ वर्षापासून कुटुंबाचं पालन पोषण करणाऱ्या 'आई'ची Mother ही कहाणी आहे. Mothers Day women working in Nanded crematorium for nine years

नांदेड Nanded शहरातील राम घाट स्मशानभूमी.. या स्मशानभूमी परिसरात वास्तव्यास असलेल्या या आहेत परमिंदर कौर......परमिंदर कौर या आपल्या वृध्द सासू, पती, एक मुलगी आणि एका मुलासह राहतात..परमिंदर कौर यांनी याच स्मशानभूमी परिसरात 'खुशी'या मुलीला जन्म दिलाय.. खुशी आता नऊ वर्षाची झालीय.. परमिंदर कौर मुळच्या अमृतसरच्या Amritsar पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी नांदेड गाठलं आणि स्मशानभूमीत करण्यास मिळालं आणि याच ठिकाणी संसार थाटला.

हे देखिल पहा- 

परमिंदर कौर या अंत्यसंस्काराचे Last Rites सरण रचण्या पासून ते राख साफ करण्याचे पर्यंतचे काम गेल्या नऊ वर्षापासून मोठ्या हिम्मतीनं करतात. त्यांना ही कामं करताना कसलीही भिती वाटतं नसल्याचं सांगतात तसंच त्या हे काम सेवा म्हणून करतात.  तुटपुंज्या मानधनात त्या संसाराचा गाडा हाकतात.

परमिंदर कौर यांचं दहावी पर्यंतचं शिक्षण झालंय. पती अशिक्षित आहेत. अंत्यसंस्काराच्या नोंदी घेण्यापासून अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकडं, गोवऱ्या इतर साहित्य देण्या बरोबरच सरण रचणे, राख साफ करणे परिसर स्वच्छ ठेवणे असे काम परमिंदर कौर करतात आणि तिच्या या कामात पती गुरुदेव सिंघ मल्ली सहकार्य करतात...कोरोनाच्या या काळात कुणी नातेवाईक जवळ यायला तयार नसेल तर अग्नी देण्याची काम ही यांनाच करावं लागत आहे. Mothers Day women working in Nanded crematorium for nine years

सध्या दररोज दहा ते पंधरा जणांवर अंत्यसंस्कार या ठिकाणी केले जातात..  रामघाट येथील परमिंदर कौर यांच्या अंत्यसंस्काराच्या कामाला आणि हिम्मतीला व्यवस्थापन समितीने चांगली साथ दिलीये. जी माता मुलाला जन्म देते.... तीच माता स्मशानभूमीत राहून दिवसरात्र मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे काम करुन कुटुंबही समर्थपणे सांभाळते आहे. या मातेला मातृदिना निमित्त साम टिव्ही कडून सलाम!
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT