आज पाहा

GoodNews | आता महाराष्ट्रात 'या' दिवशी येणार मान्सून 

साम टीव्ही न्यूज

 पुणेः हवामान खात्याने सांगितले, की नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरू असून मान्सूनने आता दक्षिण-मध्य कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. पण, पुण्यात दिवसभर पाऊस पडला नाही. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि उन्हाचा खेळ सुरू होता. दुपारनंतर उकाडा वाढला.मान्सूनने आता दक्षिण-मध्य कर्नाटकचा काही भाग व्यापला असून बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहेत. तसेच, शहरात येत्या दोन दिवसांत शहरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही वर्तवली आहे.

 राज्यातील उच्चांकी तापमान ४१.५ अंश सेल्सिअस चंद्रपूर येथे आणि नीचांकी तापमान १७.५ अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.सायंकाळी मात्र मात्र शहराच्या विविध भागांत पावसाच्या सरींचा हलका शिडकावा झाला. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहणार असून मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. दिवसभरात शहरात किमान २१.३ अंश सेल्सिअस आणि कमाल ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राहुल गांधी एक प्रवासी, देवेंद्र फडणवीस यांंचा खोटक टोला

Relationship Tips: 'या' मुलांच्या प्रेमात चुकूनही पडू नका; आयुष्य होईल उद्धस्त

MI vs KKR, IPL 2024: मुंबई की कोलकाता? कोण मारणार बाजी? पाहा दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

Health Tips: एक महिना साखर खाणं करा बंद; शरीराला होतील अनेक फायदे

Kiran Sarnaik |आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात

SCROLL FOR NEXT