बुलढाणा : तालुक्यामधील अनेक गावांमध्ये villages वन्य प्राण्यांच्या Wildlife उपद्व्यापामुळे शेतातील Farm पिकांचे crops मोठ्ठया प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना होणारा वन्य प्राण्यांचा त्रास कमी व्हावा. यासाठी उपाय योजना कराव्यात तसेच, झालेल्या नुकसानाची Damage भरपाई मिळावी. नुकसान भरपाई मिळण्यासाठी ऑनलाईन Online अर्जासोबतच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अर्ज Application स्वीकारावे.
हे देखील पहा-
यासाठी सहाय्यक वनसंरक्षक यांना जिल्हा परिषद सदस्या जयश्री शेळके सह शेतकरयानी घेराव घातला आहे. वन अधिकाऱ्यानंसोबत चर्चा करून सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पंचायत समिती सभापती उषाताई चाटे, अनिल वारे, यांच्यासह १० गावामधील लोकप्रतिनिधी शेतकरी उपस्थित होते. बुलढाणा तालुक्यात सर्व बाजूने जंगलचे प्रमाण जास्त आहेत. या जंगलात असंख्य वन्यप्राणी आहेत.
दरवर्षी हे जंगली प्राणी शेतामधील पिकांचे नुकसान करतात. प्रत्येक वेळेस वन विभागाला निवेदन दिले जाते. मात्र, वन विभाग कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना करत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता जर यावेळी वन विभागाने वन्यप्राणयांचा बंदोबस्त केला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.