Turmeric Price : हळदीचे दर १ हजाराने घरसले; लसणाला मात्र विक्रमी भाव

Washim news : मागील महिन्यात शेतकऱ्यांच्या हळदीला चांगला दर मिळाला होता. परंतु मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात घसरण
Turmeric Price
Turmeric PriceSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: हिवाळा सुरु झाल्यानंतर भाजीपाल्यांचे दर वधारले आहेत. तर स्वयंपाक घरात रोजच्या वापरात असलेल्या लसणाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील महिन्यांत हळदीला चांगला दर मिळाला असताना गट्टू आणि कान्डी या दोन्ही प्रकारच्या हळदीच्या दरात क्विंटलमागे हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वाशीम (Washim News) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करण्यात येत असते. यामुळे जिल्ह्यातील रिसोडच्या बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्रीचे व्यवहार होत असतात. हळद उत्पादक शेतकरी देखील येथे हळद विक्रीसाठी आणत असतो. दरम्यान मागील महिन्यात शेतकऱ्यांच्या (Turmeric) हळदीला चांगला दर मिळाला होता. परंतु मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

Turmeric Price
Maharashtra Politics : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत चर्चा; अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरलं?

महिनाभरात हजार रुपयांची घसरण 
मागील महिन्यात म्हणजे २४ ऑक्टोबरला रिसोडच्या बाजार समितीमध्ये कान्डी हळदीला १२ हजार ५३० ते १३ हजार ७५० रुपये आणि गट्टू हळदीला ११ हजार ९९० ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. मात्र काल झालेल्या हराशीत कान्डी हळद ११ हजार ५०० ते १३ हजार ९०० आणि गट्टू हळदीला १० हजार ३०० ते १२ हजार ८०० रुपये दर देण्यात आला. यात साधारण एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. दरातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

Turmeric Price
Alibag News : पाणी योजना राबवून सहा वर्षानंतरही गावात पाणी नाही; संतप्त ग्रामस्थ महिलांची ठेकेदाराला मारहाण

लसणाचे भाव ५०० रूपयांवर
यवतमाळ
: रोजच्या फोडणीत वापरल्या जाणाऱ्या लसणाचे (Garlic) भाव आता दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. किरकोळ बाजारात लसूण साडेचारसे ते पाचशे रूपये प्रति किलो रुपयांना विकला जात आहे. आतापर्यंतचा हा उच्चांकी दर मानला जात आहे. लसूण हा मसाल्यामधील महत्वाचा असल्याने लसूणला अधिक मागणी असते. भाव गगनाला भिडल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com