मनोज जयस्वाल
वाशीम : खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या तुरीचा मुख्य हंगाम दीड-दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अर्थात तूर काढणी करून ती मार्केटमध्ये येण्याचे अद्याप बाकी आहे. असे असताना देखील तुरीच्या दरात घसरण होण्यास सुरवात झाली आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.
वाशिमच्या (Washim) बाजार समितीमध्ये तुरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी १३ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी तूर आता साडेनऊ हजार रुपयांपेक्षा कमी दराने बाजारात विकली जात आहे. या दराच्या घसरणीमुळे (Bajar samiti) तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय आता मिळत असलेला दर पुढच्या काही दिवसात स्थिर राहीलच याची अद्याप शास्वती नाही.
तुरीचा मुख्य हंगाम दीड- दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना तुरीच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी सरकारी हस्तक्षेपाची मागणी केली जात आहे. नवीन तुरीची आवक सुरु झाल्यानंतर तरी भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.