Agriculture News : नॅनो डीएपीच्या वापरामुळे खरिप पिकांवर सकारात्मक परिणाम; शेतकऱ्याचा खर्चही कमी

नॅनो डीएपीच्या वापरामुळे खरिप पिकांवर सकारात्मक परिणाम; शेतकऱ्याचा खर्चही कमी
Agriculture News
Agriculture NewsSaam tv
Published On

मनोज जयस्वाल

वाशीम : खताचा अतिरेक टाळण्यासाठी आणि कमी खर्चात शेती पिकवण्यासाठी गेल्या काही महिने अगोदर नॅनो डीएपीचा (Farmer) वापर करण्याचं आवाहन कृषी विभाग (Agricuture Department) आणि कृषी तज्ञाकडून केले होते. त्यानतर बाजारामध्ये नॅनो युरियाप्रमाणे नॅनो डीएपीचा सकारात्मक परिणाम आता पिकांवर होताना पाहायला मिळतोय. (Latest Marathi News)

Agriculture News
Railway Crime: रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांच्या सामानाची चोरी; लुटणारे दोन चोरटे अटकेत

वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरात मोठ्या प्रमाणात नॅनो डीएपीची फवारणी केल्याने पिकामध्ये चांगला परिणाम पाहायला मिळत आहे. कमी खर्चात शेतीला नवीन पर्याय मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये (fertilizer) आनंद व्यक्त केला जात आहे. वाशिम जिल्ह्यात २० हजार लिटर नॅनो युरिया आणि नॅनो डिएपीच्या १० हजार बॉटल्स विक्री झाल्या आहेत.

Agriculture News
Bhandara Accident News: रस्त्याच्या कडेला उभे असताना ट्रकने उडविले; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, थरारक घटना सीसीटिव्हीत कैद

गेल्या काही महिन्यात रासायनिक खताना पर्याय म्हणून नॅनो डीएपीचा पर्याय खुला झाला. बाजारपेठमध्ये नॅनो डीएपी दाखल झाल आणि इफ्कोच्या कंपनी आणि कृषी विभाग यांच्या आवाहन आणि जनजागृती करून शेतकऱ्यांच्या खत पद्धतीत बदलण्यासाठी मोठी जनजागृती केल्या गेली. सुरवातीला शेतकऱ्यामध्ये नकारात्मकता दिसत होती. मात्र, आता काही शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापरा केल्यानंतर आता इतर शेतकरी नॅनो डीएपीच्या टेक्नोलॉजी वापर करत असून पिकामध्ये चांगले बदल झाल्याच सांगतात.

Agriculture News
Pandharpur News: उजनीच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; शेतकऱ्यांचा रास्तारोको आंदोलन

आर्थिक ताणही कमी 

वाशीम जिल्ह्यात नॅनो डीएपीचा वापरा केला गेला असून गतवर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. पिकावर फवारणी केल्यावर लवकर सकारात्मक परिणाम होतांना दिसत आहे. तर रासायनिक दाणेदार खते वापरल्यास कमी प्रमाणात पिकांना मिळत असल्याने शेतकऱ्यांना जास्त खताचा फायदा होत नसल्याचे चित्र होते. मात्र आता त्यात बदल होत असून थेट पिकाच्या फांद्या आणि पिक वाढीचा  फायदा पहावयास मिळते. तर पूर्वीच्या खताच्या तुलनेत वाहतूक खर्च आणि जमिनींच प्रदूषण आणि हवेच प्रदूषणसह जुन्या खताच्या ५० किलो बेग थैली करिता १३५० रुपये खर्च होत असे ते टळून एका ५०० मिलीचा नॅनो डीएपी ६०० रुपये इतका खर्च होत असून शेतकऱ्याचा आर्थिक ताण कमी होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com