Wardha News: अडीच हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा

अडीच हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास

वर्धा : महात्मा ज्‍योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पिक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या जिल्ह्यातील 2 हजार 541 शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात प्रोत्साहनपर लाभाची रक्कम ऑनलाईन जमा करण्यात आली. यामुळे बळीराजासाठी ही दिवाळी भेट ठरली आहे. (Tajya Batmya)

Wardha News
Beed News: मांजरा धरणाचे पुन्हा 6 दरवाजे उघडले; धुवाधार पावसाने बीड जलमय

गेल्या अडीच वर्षापूर्वी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती (Shetkari Sanman Yojana) योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाचा प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा (Wardha) करण्यात आली होती. आता योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.

१३ हजार शेतकऱ्यांचे खाती अपलोड

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सन 2017 ते 20 या तीन वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करुन विहित कालावधीत नियमित परतफेड केलेल्या आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकुण 13 हजार 493 शेतकऱ्यांचे खाती अपलोड करण्यात आले असून 3 हजार 198 कर्जखाती विशिष्ट क्रमांकासहीत पहिल्या टप्यात प्राप्त झाले. यापैकी 2 हजार 541 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 50 हजार रुपयाची रक्कम थेट वळती करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com