मराठवाड्यात काजू शेतीचा अनोखा यशस्वी प्रयोग!

टप्प्या टप्प्याने ही काजूची झाडे लावली
मराठवाड्यात काजू शेतीचा अनोखा यशस्वी प्रयोग!
मराठवाड्यात काजू शेतीचा अनोखा यशस्वी प्रयोग!दीपक क्षीरसागर
Published On

लातूर - मराठवाडा Marathwada तसा दुष्काळी भाग आहे. इथे सोयाबीन ऊस आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण आता मराठवाड्यात देखील आता काजूची शेती यशस्वीपणे केली जाऊ शकते हे लातूर जिल्ह्यातल्या खडक-उमरगा येथील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. विष्णू कदम Vishnu Kadam हे लातूर Latur जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या खडक उमरगा येथील रहिवाशी आहेत. विष्णू कदम यांनी आपल्या शेतात अर्ध्या एकरात काजूची अडीचशे झाडे लावली आहेत. त्यांनी  कोकणातून Kokan काजूची Cashew रोपटे आणून टप्प्या टप्प्याने ही काजूची झाडे लावली.

हे देखील पहा -

वर्ष - २०१२ पासून ते या काजूच्या झाडांना जोपासत आहे. काजू बरोबरच विष्णू कदम यांच्या शेतात आंबा, फणस, पेरू, दालचिनी, कोकम अशी वेगवेगळी झाडे आहेत. काजूच्या झाडांना दमट हवामान मानवत असलं तरी मराठवाड्यातल्या थोड्याश्या डोंगराळ जमिनीत काजू  येऊ शकतात याचं  हे उत्तम उदाहरण आहे. गेल्या चार  वर्षांपासून या बागेपासून काजूचं  उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे. कसलीही प्रक्रिया न करता जश्यास तसे कच्चे काजू विकून विष्णू कदम यांना दरवर्षी २५० पैकी ४० झाडांपासून दोन ते तीन लाख रुपये मिळत आहे.

मराठवाड्यात काजू शेतीचा अनोखा यशस्वी प्रयोग!
शेतात कामाला गेलेल्या वृद्ध महिलेचा गळा दाबून खून...

काजू झाडांना फार पाणी द्यावं लागत नाही, जेमतेम पाण्यात देखील ही झाडे टिकतात. एक ते दोन वेळा फवारणी करावी लागते,  वन्य  प्राण्यांपासून या झाडांना कसलाही धोका नाही. शेतकरी आपल्या बांधावरदेखील ही झाडे लावू शकतात. थोडीशी डोंगराळ किंवा खडकाळ जमीन असेल तर यासाठी उत्तमच.

मराठवाडा हा अनियमित पावसाचा भाग आहे. इथं सुका मेवा पदार्थांचे उत्पादन आजतागायत अशक्य होतं पण आता निलंगा इथल्या विष्णू कदमांनी यशस्वीपणे काजू शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. लातूर सारख्या दुष्काळी भागात नव्या पीक पद्धतीचा अवलंब केल्यास नक्कीच शेतकऱ्यांच्या अर्थकारणात बदल होऊ शकतो.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com