शिक्षकाने केला मधमाशी पालनाचा प्रयोग

वाशिम जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी.
शिक्षकाने केला मधमाशी पालनाचा प्रयोग
शिक्षकाने केला मधमाशी पालनाचा प्रयोगगजानन भोयर
Published On

वाशिम : वाशिम Washim जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या farmers उत्पन्नात वाढ व्हावी. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून District Administration मधमाशी Bee पालनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यामधील शेतकरी याकडे लक्ष देत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. वाशिम येथील जिल्हा परिषद शिक्षक राजू जोगदंड यांनी आपली शिक्षकाची जबाबदारी सांभाळून मधमाशी पालन सुरू केले आहे.

यांनी १०० मधमाशी पेट्या पासून सुरू केलेला, जिल्ह्यामधील पहिला प्रयोग यशस्वी ठरला आहे. वाशिम शहरामधील लाखाळा Lakhala या भागात राहणारे आहेत. जिल्हा परिषद शिक्षक हे २०१७ मधील रायगड Raigad या ठिकाणी सहलीसाठी गेले असता, त्यांनी मधमाशी पालन बघितलं आणि हे शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याचे त्यांनी मागील वर्षी कोरोनाच्या Corona काळात मधमाशी पालन करण्याचे ठरवले.

हे देखील पहा-

४ लाख ७० हजार रुपये खर्च करून १०० मधमाशी पेट्या पासून सुरू केले होते. त्यांना मागील वर्षी या मधमाशी पालनातून ४ लाख रुपये मिळाले, तर यंदा सप्टेंबर पासून पुन्हा उत्पन्न मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यात कांदा बिजोत्पादन, आणि फळबागा मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. मात्र, जिल्ह्यात मधमाशी पालन करणारे शेतकरी नसल्याने, उत्पन्नात घट होत होती.

शिक्षकाने केला मधमाशी पालनाचा प्रयोग
कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार; ठरणार राज्यातील पहिला प्रयोग

आता यांनी मधमाशी पेट्या जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्याने, शेतकऱ्यांचे ४० ते ६० टक्क्यांपर्यंत उत्पन्न वाढले असल्याचे ते यावेळी सांगत आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये कोरडवाहू शेती जास्त असून, हंगामी ओलिताची सोय अनेक शेतकऱ्यांकडे आहे. त्यामुळे खरिपात सोयाबीन आणि रब्बीत कांदा बिजोत्पादन करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. बिजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालन फायद्याचं आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी मधमाशी पालन केल्यास, शेती व्यवसाय फायद्याचा व्हायला वेळ लागणार नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com