कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार; ठरणार राज्यातील पहिला प्रयोग

akola news
akola news
Published On

अकोला : राज्यासह अकोला Akola जिल्ह्यात कोरोना Corona रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याने सर्व रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेवर बेड Bed आणि प्राथमिक उपचार मिळत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन, आता गावकऱ्यांनीच पुढाकार घेत. आपल्या गावातच कोविड  Covid सेंटर उभारावे, अशी संकल्पना मांडण्यात आली. ती सत्यात उतरवण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेतला असून  हा राज्यातील पहिला प्रयोग ठरणार आहे. Initiatives taken by the Gram Panchayat to prevent corona; Will be the first experiment in the state

अकोला जिल्ह्यातील शिर्ला Shirla ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वप्रथम ७ रुग्ण निघाले होते. त्यानंतर ५०० ते ६०० पेक्षा अधिक नागरिक पॉझिटिव्ह Positive निघाले.  सध्या ७५ पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण गावात आहेत. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे, रुग्णसंख्या लवकर आटोक्यात यावी. यासाठी पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या ऑनलाईन Online मासिक सभेमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य निर्भय पोहरे यांनी शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना तातडीने सुविधा मिळाव्या याकरिता शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुसज्ज अद्यावत कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, यासाठी प्रस्ताव मांडण्यात  आला.

प्रस्तावाला ग्रामपंचायत सदस्य फिरोज खान यांनी मान्यता दिली. यावेळी  ग्रामपंचायत सरपंच अर्चना सुधाकर शिंदे Archana Sudhakar Shinde, उपसरपंच कल्पना ज्ञानेश्वर खर्डे ग्रामपंचायत सदस्य रेखाताई गवई, मनोहर पातूरे, सय्यद इरफान, सागर कढोणे, सुरेखा वसतकार, राजिक शाह, मंगल डोंगरे, वैशाली गावंडे, किरण येनकर, पूजा इंगळे सर्व उपस्थित सदस्यांनी सर्वानूमते ठरावाला मंजुरी दिली. पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत १६ लाख ७१ हजार रुपये निधीची तरतूद शिर्ला ग्रामपंचायतीने कोविड केअर सेंटरसाठी केली आहे. Initiatives taken by the Gram Panchayat to prevent corona; Will be the first experiment in the state 

सदर तरतूद कृती आराखडामध्ये नसल्यामुळे, अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार Saurabh Katiyar यांच्याकडून आराखडा बदलण्यासाठी जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केला आहे. संपूर्ण जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे नागरिक सर्वत्र मृत्युमुखी पडत आहेत. अकोल्यात रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव वाचवणे शक्य होत नाही.  त्यामुळे गावातच कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे अशी विनंती सभेत केली.

सर्वांनी त्याला मान्यता दिली. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ठरावाला मंजुरी दिल्यानंतरच कोविड केअर सेंटर अस्तित्वात आणणे शक्य होणार आहे. ग्रामपंचायतीच्या सेवालाल भवन येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर Ventilator प्रथमोपचार सह अत्याधुनिक बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन शिर्ला ग्रामपंचायतीने केले आहे. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत ने अशा प्रकारचे ठराव घेऊन कोविड सेंटर उभारल्यास कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्याची स्वतंत्र यंत्रणा तयार होईल. ग्रामीण भागात वाढत जाणाऱ्या कोरोना आपण गावाच्या वेशिवरच काही प्रमाणात का होईना रोखू शकणार, यासाठी प्रत्येक गावांनी असा पुढाकार घ्यावे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com