पिकविम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन...

अतिवृष्टीने, पिकांचे अतोनात नुकसान
पिकविम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन...
पिकविम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन...Saam Tv
Published On

बीड - बीडमध्ये Beed पीक विम्याची मागणी करत बीड पीकविमा Crop insurance पॅटर्न रद्द करा. ही मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना Swabhimani Shetkari Sanghatana आक्रमक झाली आहे. बीड- परळी हा राज्य महामार्ग अडवत, तब्बल दोन तास घाटसावळी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरिप हंगाम 2020 च्या परतीच्या मुसळधार अतिवृष्टीने, पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यामध्ये 4 लाख 32 हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

हे देखील पहा -

मात्र बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक योजनेत जवळपास 17 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेत मोठ्या प्रमाणात आपल्या पिकांचा विमा भरला होता. मात्र आज लाखो शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ विमा मिळावा, पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करावा, राष्ट्रीयकृत बँकेतील पीक कर्ज वाटप विनाविलंब करावे.

पिकविम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन...
पुण्यात क्रीडांगणाचा बळी देण्याचा घाट ?

यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, बीड-परळी राज्य महामार्गावरील घाटसावळी गावात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान पीक विम्याचा प्रश्न मार्गी निघाला नाही तर जिल्ह्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कुलदीप करपे यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com