Farmer Agitation
Farmer Agitationसंजय जाधव

पिक विमा प्रश्नी दखल न घेतल्याने शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे कृषी विभागासमोर आंदोलन

कृषी विभागाकडून पिक विमा कंपनीस पाठीशी घातले जात असल्याचा आरोप
Published on

बुलढाणा - स्वाभिमानीच्या (Swabhimani) वेळोवेळी आंदोलनात्मक भुमिकेनंतर शासनाकडून जिल्ह्यासाठी पिक विमा मंजुर करण्यात आला. हजारोंच्या खात्यावर रक्कम जमा झाली परंतु यामध्ये सुद्धा विमा कंपनीने हुशारी करत अनेकांच्या खात्यावर कमी रक्कम देणे, काहींच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही, असंख्य शेतकरी (Farmer) पीकविमा रकमेपासून वंचित आहेत. (Swabhimani agitation in front of agriculture department with farmers)

हे देखील पहा -

नदिकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतांना तोकडी मदत देणे व इतर मागण्यांची दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी चिखली येथील कृषी कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.

Farmer Agitation
Collarwali Tigress: ‘कॉलरवाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघीणाचा मृत्यू

तर वेळोवेळी केलेल्या मागण्यांकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत असून विमा कंपनीस पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते शेतकरी यांनी केला आहे. जोपर्यंत पिकविम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत कृषी विभागाचे मैदान सोडणार नसल्याची भूमिका सरनाईक यांच्यासह आंदोलकर्ते यांनी घेतली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com