वजन काट्याला अडकवला दगड, टोमॅटोच्या मापात व्यापाऱ्याकडून पाप

पिंपळगाव बाजारसमितीतील फसवणुकीचा व्हिडिओ व्हायरल
वजन काट्याला अडकवला दगड, टोमॅटोच्या मापात व्यापाऱ्याकडून पाप
वजन काट्याला अडकवला दगड, टोमॅटोच्या मापात व्यापाऱ्याकडून पापअभिजीत सोनावणे
Published On

नाशिक - चक्क वजन काट्यालाचं खालील बाजूनं दगड अडकवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा व्हिडिओ Video सोशल मीडियावर Social Media व्हायरल झाला आहे. नाशिकच्या Nashik पिंपळगाव बाजारसमितीतील व्यापाऱ्याकडून होत असलेल्या या फसवणुकीचा व्हिडिओ व्हायरल Video Viral झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनीचं या धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड केला.

हे देखील पहा -

पिंपळगाव बाजार समिती टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे. तब्बल 4 तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी इथं टोमॅटो विक्रीसाठी येतात. टोमॅटो विक्रीनंतर पैसेही तात्काळ मिळत असल्याने शेतकरीही पिंपळगाव बाजार समितीला प्राधान्य देतात. मात्र पिंपळगाव बाजारसमितीचं व्यापाऱ्याकडून चक्क शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांनी आता या सर्व प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com