सोयाबीन स्वस्त अन् ढेप महाग; भाव झाला दुपटीपेक्षा जास्त!

मागील महिन्यात सोयाबीनला चांगलं दर मिळाले असताना आता मात्र सोयाबीनचे दर कोसळत आहेत तर दुसरीकडे राज्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीन पेंडीची टंचाई जाणवत आहे.
सोयाबीन स्वस्त अन् ढेप महाग; भाव झाला दुपटीपेक्षा जास्त!
सोयाबीन स्वस्त अन् ढेप महाग; भाव झाला दुपटीपेक्षा जास्त!दीपक क्षीरसागर
Published On

दीपक क्षीरसागर

लातुर : मागील महिन्यात सोयाबीनला Soybean चांगलं दर मिळाले असताना आता मात्र सोयाबीनचे दर कोसळत आहेत तर दुसरीकडे राज्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीन पेंडीची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सोया पेंडीचे भाव एका टनामागे चक्क दुपटीन वाढले आहेत. ते 40 हजारांवरून चक्क 75 हजारावर गेले आहेत त्यामुळे पेंडीचे भाव टनामागे चक्क दुपट वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत. 

हे देखील पहा-

भारतात सोयाबीनचा सर्वात जास्त वापर पोल्ट्री खाद्य म्हणून केला जातो. भारतात एकूण उत्पन्नापैकी 60 % सोयाबीन त्यासाठी वापरले जाते. यातून पंचवीस टक्के सोयाबीनची निर्यात होते, तर पंधरा टक्के सोयबीनवर प्रक्रिया केली जाते त्यापासून मानवी खाद्य तयार केले जाते. कोंबड्यांचे खाद्य म्हणून पोल्ट्री व्यावसायिक सोयाबीन पेंडीला पसंदी देतात. यामध्ये जास्त प्रोटीन्स असतात. यामुळेच कोंबड्यांच्या वाढी होण्यास पोषक ठरतात. मात्र, आता या सोया पेंडीची भाववाढ झाल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी हीच सोया पेंड 35 ते 40 हजार टन असा भाव होता आता 75 हजार टन असा भाव झाल्याने एका बॉयलर कोंबड्याच्या उत्पादनाचा खर्च 60 रुपयावरून 100 रुपया पर्यंत गेला असल्याने पोल्ट्री व्यवसायीकाना नुकसानदायक ठरत असल्याचे मत ललित लांजेवार या पोल्ट्री उत्पादकाने म्हटले असून यामुळे राज्यातील पोल्ट्री उत्पादक चिंतेत आहेत

देशात महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. अद्यापही बाजारपेठेत सोयाबीनची आवक सुरू झाली नाही. मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. या पावसाने सोयबीन पिकाचे नुकसान होऊ शकते. केंद्र सरकार 30 ऑक्टोबर पर्यंतच सोयाबीन पेंडीची आयात करणार होते. मात्र, देशात सोयाबीनची कमतरता असल्याने आणि अजून खरिपाचे पीक आलेले नाही.

सोयाबीन स्वस्त अन् ढेप महाग; भाव झाला दुपटीपेक्षा जास्त!
दिल्ली कोर्टातच गॅंगवॉर; गँगस्टर गोगी सह चार जणांचा मृत्यू!

त्यामुळे टंचाई वाढू नये यासाठी आयातीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने पोल्ट्री व्यावसायिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. पण सोयाबीनचे उपउत्पादनाचे दर वाढले असताना सोयाबीनला बाजारात निम्म्याहून कमी दर मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

बाजारपेठेतील दराचा आढावा शासकीय धोरण हे प्रक्रिया उत्पादक कारखानदारांच्या फायद्याचे असून सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिकाना नुकसानीचा आहे. सरकारने यावर योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल यांनी दिला आहे. तर दुसरीकडे 2022 पर्यंत मोदी सरकार शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करणार असा दावा केला, पण सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी यांना नुकसानदायक असल्याचा संताप शेतकऱ्यांच पोर या संघटनेचे नेते अजिंक्य शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

तर केंद्र सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याने केंद्र सरकारने यावर ठोस निर्णय घ्यावा आणि कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल यांनी दिला आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com