काढणीला आलेले सोयाबीन आणि कापसाचे पीक पाण्यात; शेतकरी हवालदिल

हाता-तोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक वाया गेले आहे तर उरला सुरल्या कापूस अतिपाण्याने काळा पडून कोंबे फुटल्याने विकला जातो की नाही यांची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
काढणीला आलेले सोयाबीन आणि कापसाचे पीक पाण्यात; शेतकरी हवालदिल
काढणीला आलेले सोयाबीन आणि कापसाचे पीक पाण्यात; शेतकरी हवालदिलराजेश काटकर
Published On

परभणी: परभणी जिल्ह्यात नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार ४ लाख ५२ हजार ८२ शेतकऱ्यांची २ लाख ४६ हजार ३१६ हेक्टरवरील पीके बाधित झाली आहेत. १ जून ते २८ सप्टेंबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी तसेच विविध नद्यांच्या पूरपरिस्थितीमुळे फटका बसला. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त, तर आॅगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात सरासरी १६९ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३८३.१ मिमी पाऊस झाला. जून ते सप्टेंबर महिन्यात ७६१ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १०९९.७ मिमी पाऊस (१४४.३ टक्के) झाला आहे. (soybean and cotton crops are wastage due to heavy rain, farmers are in tension)

हे देखील पहा -

अनेकदा जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. ओढे, नाले, गोदावरी, पूर्णा, दुधना, करपरा, कसुरा, लेंडी, गलाटी आदी नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने जमिनी खरडून गेल्या. पिके पाण्यात बुडाल्याने सडून गेली. सोयाबीन, कपाशी, तूर या खरीप पिकांसह ऊस, केळी, हळद ही बागायती पिके, संत्रा, मोसंबी आदी फळपिके, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. विविध ठिकाणचे ३७ तलाव आणि २९ कोल्हापुरी बंधारे फुटले.

काढणीला आलेले सोयाबीन आणि कापसाचे पीक पाण्यात; शेतकरी हवालदिल
तीन नर्सिंग विद्यार्थ्यांसह तीन वर्षांचा मुलगा कोरोना बाधीत

परभणी जिल्ह्यात खरिपाच्या साडेपाच लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यात कापूस व सोयाबीनचा पेरा अधिक होता. पण मागील महिन्यात झालेल्या पावसाने जिल्हातील अडीच लाख हेक्टरवर पिके बाधित झाली असून कापूस व सोयाबीन हया नगदी पिकाचे नुकसान झाले आहे. ह्या दोन पिकांवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन वाया गेले आहे तर उरला सुरल्या कापूस अतिपाण्याने काळा पडून कोंबे फुटल्याने विकला जातो की नाही यांची चिंता शेतकऱ्याना सतावत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com