Osmanabad News
Osmanabad NewsSaam Tv

खरिपाची पेरणी जवळपास पूर्ण; कर्ज स्वरूपात मदत करण्यासाठी बँकांची टाळाटाळ

मागील दोन वर्ष जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले होते.
Published on

कैलास चौधरी

उस्मानाबाद - खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात आल्या तरी अद्याप बँकांनी मात्र कृषी कर्ज देण्यास बँकांनी (Bank) उदासीनता दाखवली आहे उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात तर बँकांची उदासीनता अधिक तीव्रतेने जाणवते शेतकऱ्यांना बँकांनी केवळ नाममात्र कृषी कर्ज केले उस्मानाबाद जिल्ह्यात खरिपाची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे.

मात्र यासाठी शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, म्हणून शासनाच्या वतीने जिल्ह्याला खरीप हंगामासाठी 1362 कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत 88 हजार 171 शेतकऱ्यांना फक्त 637 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.

हे देखील पाहा -

जिल्ह्यात वर्षा दोन वर्षाआड दुष्काळ पडतो. कधी अतिवृष्टी तर कधी नापिकीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापतो. मागील दोन वर्ष जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले होते. तसेच काही शेतकऱ्यांचे बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीही करावी लागली होती. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता.

Osmanabad News
राजकीय हेतूने 'मविआ'ने घेतलेले निर्णय मोडीत; हसन मुश्रीफ यांचा हल्लाबोल

यंदा पाऊस लांबल्याने पेरणीलाही तब्बल एक महिना पेरणी उशीरा झाली त्यातच कीटकनाशके, बियाणे यांच्या किमती वाढल्या आधीच शेतकरी अडचणीचा सामना करत असताना कर्ज स्वरूपात मदत करणे आवश्यक होते मात्र याकडे बँकांनी चक्क डोळेझाक करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचे पाहायला मिळते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com