राजकीय हेतूने 'मविआ'ने घेतलेले निर्णय मोडीत; हसन मुश्रीफ यांचा हल्लाबोल

याची अंमलबजावणी आणि परिणाम याचाही अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
Hasan Mushrif Latest News, Hasan Mushrif News, Kolhapur Political News Updates
Hasan Mushrif Latest News, Hasan Mushrif News, Kolhapur Political News UpdatesSaam Tv
Published On

कोल्हापूर - शिंदे फडणवीस सरकारने काल एक निर्णय घेतले त्यात सरपंच, नगराध्यक्ष जनतेतून निवड करण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारने कोणते राजकीय हीत साधण्यासाठी निवडणुकांमध्ये बदल केला नव्हता तर जे व्यवहार्य आहे ते पाहूनच निर्णय घेतल्याचे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः च हे प्रस्ताव त्यावेळी मांडलं होता. मात्र, सध्या राज्यात उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे राजकीय हेतूने महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय मोडीत काढत आहेत. मात्र, याची अंमलबजावणी आणि परिणाम याचाही अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील पाहा -

शिंदे फडणवीस सरकारने बाजारसमितीच्या निवडणुकीसाठी शेतकरी मतदान करतील असा निर्णय घेतला आहे. मात्र लोकसभेच्या मतदारसंघा एवढी मतदार संख्या बाजार समिती साठी होईल आणि याचा खर्च बाजार समित्यांना परवडणार नाही. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्याच जाहीर केलं होतं. पण मध्यंतरी दोन वर्ष कोरोनामुळे हा निधी देणे शक्य झाले नाही.

Hasan Mushrif Latest News, Hasan Mushrif News, Kolhapur Political News Updates
Jalgaon: वडीलांचे क्षणभर दुर्लक्ष अन्‌ तरूणाची आत्‍महत्‍या; कामाच्‍या ठिकाणीच घडला प्रकार

पण अर्थसंकल्पात याकरीता निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय महाविकास आघाडीचा असून आता राज्य सरकारकडून केवळ अंमलबजावणी केली जाणार आहे. जनतेलाही माहिती आहे निर्णय कुणाचा आहे त्यामुळे श्रेयासाठी घोषणा न करण्याचा सल्लाही हसन मुशिफ यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com