Sangli Sugar Factory : सांगली जिल्ह्यात १५ कारखान्यांमध्ये ४१ लाख टन उसाचे गाळप; ८ लाख टनाने गाळप होणार कमी

Sangli News : २०२३ ते २०२४ च्या गळीत हंगामात एक लाख ४४ हजार १२७ हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये सात हजार हेक्टर क्षेत्रात घट होऊन यंदाच्या गळीत हंगामामध्ये एक लाख ३७ हजार १०४ हेक्टर क्षेत्र झाले आहे
Sangli Sugar Factory
Sangli Sugar FactorySaam tv
Published On

सांगली : सांगली जिल्ह्यात एकूण १८ साखर कारखाने आहेत. या कारखान्यापैकी १५ साखर कारखान्यांमध्ये गेल्या दोन महिन्यात ४१ लाख ४४ हजार ३०१ टन उसाचे गाळप करून ४१ लाख ८२ हजार ४४४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. मात्र यंदा उसाच्या उत्पादनात घट झाल्याने कारखान्यांची अडचण होणार असून यंदा मार्चपर्यंत गाळप हंगाम चालविणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मान्सून आणि परतीच्या पाऊस सांगली जिल्ह्यात कोसळला आहे. त्यानंतरही बराच काळ ढगाळ हवामान राहिले. या सर्व वातावरणातील बदलामुळे उसाची पुरेशी वाढ झाली नाही. जिल्ह्यात २०२३ ते २०२४ च्या गळीत हंगामात एक लाख ४४ हजार १२७ हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये सात हजार हेक्टर क्षेत्रात घट होऊन यंदाच्या गळीत हंगामामध्ये एक लाख ३७ हजार १०४ हेक्टर क्षेत्र झाले आहे. या सर्वाचा जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या गळीत हंगामावर परिणाम झाला आहे. 

Sangli Sugar Factory
Nagpur Flyovers : नागपूरातील १४ उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद; नायलॅान मांजामुळे अपघात टाळण्यासाठी निर्णय

४१ लाख ८२ हजार क्विंटल साखर उत्पादन 

सांगली जिल्ह्यातील एकूण १८ साखर कारखान्यापैकी १५ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. ऊस उत्पादन चांगले नसल्यामुळे कारखान्यांना उसाचा पुरवठा देखील पुरेसा होत नव्हता. मात्र ऊस तोडणी झाल्यापासून म्हणजे मागील दोन महिन्यात ४१ लाख ४४ हजार ३०१ टन उसाचे गाळप करून ४१ लाख ८२ हजार ४४४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यात पुढील काही दिवसात काही प्रमाणात वाढ होईल. 

Sangli Sugar Factory
Wardha Corporation : वर्धा नगरपालिकेची ५०० जणांना नोटीस; साडेआठ कोटींचा मालमत्ता कर थकीत

८ लाख टनापर्यंत गाळप होणार कमी 

अतिवृष्टी आणि ढगाळ हवामानामुळे उसाच्या उत्पादनात घट आणि उसाचे क्षेत्रही जवळपास घटले आहे. यामुळे ऊस उपलब्ध करण्यासाठी सर्वच कारखान्यांचे धावपळ सुरू झाली आहे. तर जिल्ह्यातील साखर कारखान्यासमोर १५ मार्चपर्यंत गळीत हंगाम चालणार आहे. तर कारखान्याचे आठ लाख टनापर्यंत गाळप कमी होईल असा अंदाज कारखाना प्रशासनाकडून व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com