Pomegranate Price : डाळिंबाला उच्चांकी दर; सव्वा दोनशे रुपयापर्यंत उसळी

Sangli News : राज्यात अनेक भागात एप्रिल, मे आणि जून मध्ये हंगाम धरला होता. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना हंगाम उशीर होत हंगाम धरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जूनमध्ये बागा धरल्या
Pomegranate Price
Pomegranate PriceSaam tv
Published On

सांगली : यंदा डाळिंबाच्या कमी उत्पादनामुळे डाळिंबाला प्रति किलो २०० ते २५० रुपयापर्यंत दराने उसळी घेतली आहे. डाळींब मिळत नसल्याने व्यापारी सापडेल तेथे बागेतून उच्चांकी दराने डाळिंबाची खरेदी करू लागला आहे. तर स्थानिक लिलाव बाजार पेक्षा पुणे लिलावाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळे डाळींब उत्पादक असलेल्या शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडीला डाळिंब मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा राज्यात पावसाचा डाळिंबाला मोठा फटका बसला आहे. राज्यात अनेक भागात एप्रिल, मे आणि जून मध्ये हंगाम धरला होता. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना हंगाम उशीर होत हंगाम धरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जूनमध्ये बागा धरल्या गेल्या. मे आणि जूनमध्ये हंगाम धरलेल्या बागेतील डाळिंब संपले आहेत. 

Pomegranate Price
Smartphones To Anganwadi Workers: खूशखबर! बीडमध्ये 3 हजारपेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन

यंदा डिसेंबरपासूनच दरात वाढ 

दरवर्षी डिसेंबर अखेर डाळिंब मागणीत वाढ होत असते. तर बाजारपेठेत डाळिंब ही मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र जानेवारीनंतर आवक कमी होते आणि दरात वाढ होण्यास सुरवात होते. यंदा मात्र डिसेंबर पासूनच दरात वाढ सुरू होण्यास सुरवात झाली आहे. तर आगामी दिवसात डाळींबाची आवक अधिक होणार नसल्याचे चित्र सध्या तरी पाहण्यास मिळत असून डाळींबाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Pomegranate Price
Ujani Dam : उजनी धरणावर कृषी पर्यटनासाठी १९ कोटींचा निधी; पर्यटकांसाठी बांधण्यात येणार रिसॉर्ट

मागणी अधिक वाढली 

राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि नाशिक अशा मोठ्या शहरातील ग्राहकांना डाळिंब पुरवण्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे दरात पंधरा दिवसापासून रोज वाढ होत आहे. डाळिंबाचा सरासरी प्रति किलो ८० रुपये पासून आता २२५ रुपये पर्यंत भाव गेला आहे. डाळिंबाची व्यापाऱ्यांकडून मिळेल त्या दराने खरेदी सुरू आहे. हा दर आतापर्यंतचा उच्चांकी ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com