Unseasonal Rain : अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांनी द्राक्षबागांवर चालविली कुऱ्हाड

Sangli News : जवळपास १५ ते २० एकर क्षेत्रावरील द्राक्षे काढणीला असताना अवकाळीचा फटका बसल्याने झाडांवरच घडकूज झाली आहे
Unseasonal Rain Grapes Farm
Unseasonal Rain Grapes FarmSaam tv
Published On

सांगली : दुष्काळी परस्थितीत टँकरने पाणी आणून जगावलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा आता शेतकऱ्यांना (Farmer) स्वतःच्याच हाताने उध्वस्त करण्याची वेळ आली आहे. द्राक्षांचे आगार असणाऱ्या (Sangli) तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडी येथे जवळपास १५ ते २० शेतकऱ्यांनी सामूहिकपणे द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (Live Marathi News)

Unseasonal Rain Grapes Farm
Ahmednagar News : ग्रामस्थांचा अवैध व्यवसायांवर हल्लाबोल; हातभट्ट्या केल्या उध्वस्त, प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त

अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसला आहे. जवळपास १५ ते २० एकर क्षेत्रावरील द्राक्षे काढणीला असताना अवकाळीचा फटका बसल्याने झाडांवरच घडकूज झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मणी फुटल्याने दलालांकडून दर देखील मिळत नाही. याशिवाय उरली-सुरली द्राक्ष काढणीला हजारो रुपये खर्च येत असल्याने अखेर हतबल झालेल्या शेतकऱ्यांकडून द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Unseasonal Rain Grapes Farm
Samruddhi Mahamarg Accident: पीडित परिवारांना द्या मदत; समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या परिवारांचा मूक मोर्चा

शेतकऱ्यांची मदतीची मागणी 

अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. लोकरेवाडीतील जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांनी आपल्या ३ ते ४ एकर क्षेत्रावरील द्राक्षबागांवर थेट कुऱ्हाड चालवलेली आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण गावात देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे द्राक्षबाग शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत द्यावी; अशी मागणी शेतकरयांकडून करण्यात येत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com