Red Chilli Market : सांगलीच्या मार्केटमध्ये लाल मिरचीची ८५०० क्विंटल आवक

Sangli News : मिरची आज प्रत्येकाच्या घरात गरजेची आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये मिरचीचे सर्वाधिक उत्पादन उत्पादन घेतले जाते वेगवेगळ्या हंगामात मिरची बाजारात दाखल होते
Red Chilli Market
Red Chilli MarketSaam tv
Published On

सांगली : सध्या मिरची तोडणीला सुरवात झाली आहे. यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक सुरु झाली आहे. नांदुरबार जिल्ह्यानंतर सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची आवक होत असून सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आवारात यावर्षी डिसेंबर अखेर ८ हजार ५०० क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. येत्या काही दिवसात आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

मिरची आज प्रत्येकाच्या घरात गरजेची आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये मिरचीचे सर्वाधिक उत्पादन उत्पादन घेतले जात असते. वेगवेगळ्या हंगामात या राज्यातून मिरची बाजारात दाखल होते. कर्नाटकच्या ब्याडगी, आंध्र प्रदेशच्या गुंटूर आणि मध्यप्रदेशच्या तेजा या मिरचीच्या जातींचा समावेश आहे. सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर चटणी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी केली जाते. याची आवक आतापासून होण्यास सुरवात झाली आहे. 

Red Chilli Market
Wardha Liquor Ban : वर्षभरात दारू विक्रीचे सात हजारांवर गुन्हे; दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील वास्तव

फेब्रुवारीत नव्याने आवक 

जानेवारी, फेब्रुवारी,मार्च या कालावधीमध्ये मिरचीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. दरम्यान सांगलीच्या बाजार समितीत आवक वाढली असून फेब्रुवारी २०२५ मध्ये नव्याने मिरचीची आवक होणार असल्याचे मार्केट कमिटीतर्फे सांगण्यात आले. मार्केटमध्ये लाल मिरचीमध्ये बेडगी, गुंटूर, लवंगी, काश्मिरी या प्रकारच्या मिरच्यांच्या आवक होते. त्यातील बेडगी आणि लवंगी मिरचीला जास्त मागणी आहे. मिरचीचा हंगाम फेब्रुवारी ते मार्च महिन्यात सुरू होतो.

Red Chilli Market
Food Poisoning : गुळपट्टी खाण्यातून दिंडीतील भाविकांना विषबाधा; शेगाव येथून परतल्यानंतर झाला त्रास

भावही मिळतोय चांगला 

नंदुरबार, सांगलीच्या बाजार समितीमध्ये मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. प्रामुख्याने मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून मिरची या दोन्ही मार्केटमध्ये येत असल्याने मोठी उलाढाल यातून होत असते. शिवाय मिरची उत्पादक शेतकऱ्यांना देखील बाजार समितीत सध्या चांगला भाव मिळत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com