Sambhajinagar : लागवड केलेल्या डाळींबाची अडीचशे रोपे उपटून फेकली; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील शेतकरी देवराव राऊत यांनी एक एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाच्या रोपांची लागवड केली होती. यात साधारण सव्वा तीनशे झाडे लागवड केली होती
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : शेतात वेगळा प्रयोग म्हणून शेतकऱ्याने शेतात डाळींबाची लागवड केली होती. मात्र शेतामध्ये लावलेली अडीचशे डाळिंबाची झाड अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळेस उपटून टाकल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मध्ये घडली आहे. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दिली आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील शेतकरी देवराव राऊत यांच्या शेतीतील एक एकर क्षेत्रामध्ये चार महिन्यापूर्वी डाळिंबाच्या रोपांची लागवड केली होती. यात साधारण सव्वा तीनशे झाडे या क्षेत्रात लागवड केली होती. भर उन्हाळ्यात ठिबकच्या साहाय्याने या रोपांना पाणी देत चार महिन्यांपासून संगोपन करत जगविले होते. या रोपांचे नुकसान अज्ञाताने केले आहे. 

Sambhajinagar News
Water Scheme Scam : म्हैसाळ सिंचन योजनेत साडेदहा लाखांचा घोटाळा; ठेकेदारावर गुन्हा दाखल

पोलिसात तक्रार दाखल 

दरम्यान ८ जूनच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने सुमारे सव्वा दोनशे डाळिंबाची झाडे उपटून नासाडी केली. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकरी देवराव राऊत हे सोमवारी सकाळी शेतात आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. यात मोठे नुकसान या शेतकऱ्याचे झाले असून या प्रकरणी देवराव राऊत यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे.

Sambhajinagar News
Jalna Crime : नवरदेवाच्या बहिणीसोबत घडले भयंकर; जेवणाच्या हॉलमध्ये जाताच मुलींनी साधला डाव, लग्न मंडपात खळबळ

कोल्हापूर सांगली जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा मोठा धोका निर्माण होत असतो. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला सर्वाधिक पुराचा फटका बसत आहे. पूर्वाधित क्षेत्रासाठी मित्रा संस्थे मार्फत जागतिक बँकेकडून मोठा निधी ही वर्ग करण्यात आलेला आहे. मात्र या निधीचा विनियोग पुरबाधित क्षेत्रात करण्याऐवजी तो कोल्हापूर महापालिका आणि सांगली महापालिका परिक्षेत्रात करण्यात आला. याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने पुरबाधित शेतकऱ्यांनी आंदोलन करत प्रशासनाचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com