Sambhajinagar News : अवकाळीच्या मदतीपोटी २०६ कोटी; संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना फायदा

Sambhajinagar News : राज्यातील अनेक भागात नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झोडपले होते. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अगदी हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांपासून हिरावला होता
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले होते. (Sambhajinagar) या नुकसान झालेल्या पिकांच्या मदतीपोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यात २०६ कोटी मंजूर झाले आहेत. (Breaking Marathi News)

Sambhajinagar News
Washim Accident : नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी

राज्यातील अनेक भागात नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने (Rain) झोडपले होते. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अगदी हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांपासून हिरावला होता. यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४८ हेक्टरला अवकाळी पावसाचा प्रचंड तडाखा बसला होता. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २०६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar News
Dombivali Railway Station : डोंबिवली स्टेशन परिसराचा होणार कायापालट; सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी

शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असून प्रत्यक्षात या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. गतवर्षी खरीप पिकासह रब्बी पिकाचेही अवकाळीच्या तडक्याने मोठे नुकसान झाले होते. दरम्यान मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारकडून ९ लाख ६७ हजार शेतकऱ्यांन ७०९ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com