
पुणे : कोबीला (cabbage) सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. केवळ एक रुपया किलो या दराने कोबीची खरेदी होत असून या बाजारभावामुळे गुंतवलेले भांडवल दूरच परंतु कोबी काढण्याची मजुरी, वाहतूक खर्च देखिल वसूल होत नसल्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी (Farmer) कोबीच्या शेतांमध्ये (In Farm) रोटर फिरवले आहेत.(Rotor rotated on cabbage crops as farmers were not getting rates)
हे देखील पहा-
नगदी पिक म्हणून कोबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. दिड महिन्यापूर्वी कोबीला बाजारभाव चांगला मिळत होता. परंतु त्यानंतर बाजारभावात मोठी घसरण होत गेली. सध्या एक रुपया किलो दराने कोबी खरेदी केला जात आहे. या बाजारभावातून कोबी पिकासाठी गुंतवलेले भांडवल तर दूरच परंतू मजुरी व बाजारपेठेपर्यंत नेण्याचा वाहतुकीचा खर्च देखिल वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कोबी पिकाची काढणी थांबवली आहे. तर काही शेतकऱ्यांनी मेंढपाळांना बोलवून शेतामध्ये शेळ्या-मेंढ्या जनावरे सोडली आहेत अशाच काही शेतकऱ्यांना इतर पिके घ्यायची असल्याने कोबिच्या पिकांमधूनच रोटर फिरवला आहे.
थोरांदळे गावातील शेतकरी विकास कोकणे यांनी कोबीचे पिक घेतले. उत्पादन देखिल भरघोस मिळाले. परंतु सुरुवातीपासूनच बाजारभाव मिळाला नाही. गुंतवलेले भांडवल अंगावर आल्याने त्यांनी कोबीच्या पिकात रोटर फिरवण्याचा निर्णय घेतला असल्याच कोकणे यांनी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.