गृहिणींचे बजेट कोलमडणार; पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांच्या किंमतीत वाढ

अतिउष्णतेने शेतातच भाज्या खराब झाल्या होत्या. यामुळे भाज्यांच्या आवकीवर परिणाम झाला.
Vegetables
VegetablesSaam Tv
Published On

औरंगाबाद - वाढत चाललेल्या महागाईमध्ये आता भाज्यांनीही फोडणी टाकली आहे. उन्हाळा संपून पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांच्या किमतीत दोन-तीन पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे भाजी कोणती करायची असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. भाज्यांच्या महागाईमुळे औरंगाबाद (Aurangabad) शहरातील भाजी मार्केटमध्ये ग्राहक कधी येतील, याची वाट भाजी विक्रेते पाहत आहे, अशी स्थिती आहे.

दररोजच्या जेवणात लागणारा शेवगा, दोडके, कारले आता १०० रुपये किलोने मिळतायत. टोमॅटो ८० रुपये किलोने मिळतायत. औरंगाबाद शहरात दररोज ३० ते ४० टन टोमॅटो दररोज विक्री होतात. मात्र, टोमॅटोचीही आवक कमी झाली. यामुळे भाव आठवडाभरात ६० रुपयांहून ८० रुपये किलोपर्यंत गेला.

हे देखील पाहा -

त्यापुढे जाऊन बीन्स १६० रुपये किलोने मिळाल्याने हे भाव ऐकूनच सर्वसामान्य ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहे. आवक कमी असल्याने भाज्यांचाही तुटवडा आहे. अनेक भाज्यांनी शंभरी पार केल्याने गृहिणींना कोणती भाजी खरेदी करू असा यक्षप्रश्न पडत आहे. यंदा उन्हाने चाळीशीचा टप्पा राज्यभरात सगळीकडे पार गेल्यानं उन्हाळ्यात अति उष्णतेचा परिणाम भाज्यांवरही झाला. यामुळे भाज्यांची आवक कमी झाली.

Vegetables
शिवसेनेचं नियोजन चुकलं, एक फोन सुद्धा केला नाही - अपक्ष आमदार देवेंद्र भुयार

दुसरीकडे लग्नसराई, हॉटेलिंगमुळे बाजारात भाज्यांची मागणी वाढली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने भाववाढ झाली, त्यामुळे भाज्याचे भाव वाढत गेले. अतिउष्णतेने शेतातच भाज्या खराब झाल्या होत्या. यामुळे भाज्यांच्या आवकीवर परिणाम झाला. भाज्यांचे भाव कमी होण्यासाठी एक महिना लागेल, असा अंदाज असल्यानं किमान पावसाळी भाज्या येईपर्यंत भाज्यांच्या महागाईचे चटके सहन करावेच लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com