Rice Production To Fall : देशात तांदळाच्या उत्पादनात घट, किमती वाढणार ? जाणून घ्या काय आहे कारण

जगात सगळ्यात जास्त भात आशिया खंडात पिकवला जातो आणि खाल्ला जातो. हेच भाताचं पीक (Paddy) संकटात सापडलं आहे.
Rice news
Rice newssaam tv
Published On

Rice production shortfall : जगात सगळ्यात जास्त भात आशिया खंडात पिकवला जातो आणि खाल्ला जातो. हेच भाताचं पीक (Paddy) संकटात सापडलं आहे. देशात चांगला पाऊस न पडल्याने त्याचा परिणाम भाताच्या पिकावर झाला आहे. त्यात भारत देश हा जगभरात सर्वाधिक तांदूळ (Rice) निर्यात करतो.

Rice news
Silver Price: चढउतारानंतर चांदीला पुन्‍हा चकाकी

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात गव्हाचं उत्पादन घटलं आहे. त्यामुळे जगात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. गहू महाग झाल्याने त्यापासून तयार होणारं पीठ आणि त्यापासून तयार होणारे अन्य पदार्थ देखील महाग झाले आहेत. यामुळे महागाई देखील वाढली आहे. जगभरात महागाई वाढली असताना आता देशात तांदळाचे उत्पादन घटल्याने त्यामुळे झालेल्या तुटवड्यामुळे त्याचा फटका जगभरातील लोकांना बसणार आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसहित अनेक राज्यात पाऊस कमी पडल्यामुळे भाताच्या पेरणीत १३ टक्के घट झाली आहे.

तांदळाच्या उत्पादनात घट झाल्याने सरकारकडून गहू आणि साखरेसहित तांदळाच्या निर्यातीवर बंधने लादली जाऊ शकतात. संपूर्ण जगात तांदळाच्या व्यापारात भारताचा वाटा ४० टक्के आहे.

Rice news
Monkeypox Vaccine: मंकीपॉक्स लस कधी येईल? अदर पूनावाला यांनी दिली महत्वाची माहिती

तांदळाच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या

जगभरात तांदळाचं उत्पादन घटल्याने किमती वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन आठवड्यात पश्चिम बंगाल, ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यात तांदळाच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगाच्या सर्वात अधिक तांदळाचा खप भारतात होतो. तांदळाचे उत्पादन घटल्याने त्याचा परिणाम महागाई वाढलेल्या देशाच्या राजकीय आणि आर्थिक स्थिरतेवर देखील होऊ शकतो. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसावर सर्व काही अवलंबून आहे. देशात तांदळाचे उत्पादन घटल्यास त्याचा मोठा फटका देशातील नागरिकांना बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com