पुणे: बातमी एका सेंद्रिय शेतीची अगदी दोन बाय चार फुटात ही अनोखी भाजीपाल्याची शेती केली जात आहे. एक आगळी वेगळी शेती तुम्ही करू शकता आणि रोजचा फळ भाजीपाला घरच्या घरी तुम्ही पिकवू शकता तोही सेंद्रिय पद्धतीने कसा वाचा सविस्तर. आता सध्या अनेकांना ऑरगँनिक भाजीपाल्याची क्रेझ आहे. पुण्यातील सुरज मांढरे यांनी पिकवली आहे ही अनोखी शेती. तेही अगदी कमी जागेत आणि कमी खर्चात. घरच्या घरी भाज्यांचे उत्पादन घेता येईल असे ऑरगँनिक टॉवरची निर्मिती करून उत्तम पालेभाज्यांची शेती सूरज मांढरे हे घरातूनच करीत आहेत. या टॉवरच्या माध्यमातून जवळपास 60 भाज्यांचे उत्पादन मांढरे कुटुंबीय घेत आहेत. आता नेमकं ऑरगँनिक व्हेजिटेबल टॉवर म्हणजे काय तर फायबरच्या दोन बाय चार फुटांचा हा टॉवर आहे त्यात माती टाकून भाजीपाला उगवेल अशी मोकळी जागा असते.
पाणी आणि खत देता येईल अशी सोय ही करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या सुपीक जमिनीवर येणाऱ्या भाजीपाल्या प्रमाणे या ऑरगँनिक टॉवरमध्ये भाज्यांचे उत्पादन घेता येते. कमी जागेत कमी खर्चात घरच्या घरी गरजेचा भाजीपाला घेण्यासाठी या टॉवर शेतीची निर्मिती करण्यात आली आहे आणि ही नामी शक्कल लढवली ती भोर दिवळे गावातील सूरज मांढरे या शेतकऱ्याने. या ऑरगँनिक टॉवर मुळे शहरी भागातील नागरिकांना घरीच भाजीपाल्याचे उत्पादन घेता येणार आहे. ऐवढच नाही तर भाज्यांसोबत फुलझाडांची ही लागवड कमी जागेत करता येणार आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.