Muskmelon Farming : हिवाळ्यातील खरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग; एकरी १२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित

Pandharpur News : मुळात जानेवारी ते मार्च या दरम्यान लागवड करण्यात येत असलेल्या खरबूजची लागवड हिवाळ्यात केली. यामुळे ऐन हिवाळ्यात त्यांचे खरबूज काढणीस तयार झाले आहे.
Muskmelon Farming
Muskmelon FarmingSaam tv
Published On

पंढरपूर : खरबूज पिकाची लागवड प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या दरम्यान केली जात असते. मात्र दुष्काळी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यात शेतकऱ्याचा हिवाळ्यातील खरबूज लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. योग्य नियोजनातून हे शक्य होत असून एकरी १२ लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला अपेक्षित आहे. 

पंढरपूर जिल्ह्यातील सांगोल्यातील सोनलवाडी येथील शेतकरी नाथा हेगडे यांनी खडकाळ माळरानावर दोन एकर क्षेत्रावर बाॅबी खरबूज लागवड केली आहे. मुळात जानेवारी ते मार्च या दरम्यान लागवड करण्यात येत असलेल्या खरबूजची लागवड हिवाळ्यात केली. यामुळे ऐन हिवाळ्यात त्यांचे खरबूज काढणीस तयार झाले आहे. अर्थात शेतकरी नाथा हेगडे यांनी हिवाळ्यात उत्पन्न मिळावे या दृष्टीने लागवड केली. 

Muskmelon Farming
Amravati Crime News : पीक रखवालीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची हत्या; नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा

खरबूज लागवड केल्यानंतर त्याला पाणी आणि खतांचे योग्य नियोजन केल्याने त्यांना ३० टन उत्पन्न मिळेल. यातून त्यांना अवघ्या तीन महिन्यांमध्ये सुमारे १२ लाखांचे उत्पन्न मिळेल; असा त्यांना विश्वास आहे. यासाठी त्यांनी शेती तज्ञ कालिदास बजबळकर यांचे मार्गदर्शन घेतले होते. यामुळेच हिवाळ्यातील खरबूज लागवडीचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. 

Muskmelon Farming
Malegaon News : बनावट दारू कारखाना उध्वस्त; ४ जण ताब्यात, मालेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

काकडीला कवडीमोल भाव
नांदेड
: बाजारात भाजी पाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. काकडीला देखील बाजारात कवडीमोल भाव मिळतोय. काकडीला बाजारात १० ते १२ रुपय प्रतिकिलो दर मिळत असल्याने काकडी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारात काकडीला भाव नसल्याने लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com