१३ मंडळांत होणार पिकांचे पंचनामे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश; दोन दिवसांत मागविला अहवाल

पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
Latur News
Latur NewsSaam Tv
Published On

लातूर - गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिके पाण्यात गेली. शेतकऱ्यांवर (Farmer)आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये पिकांचे व शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषि विभागाला दिल्याची माहिती महसूल विभागातून देण्यात आली आहे.

लातूर (Latur) जिल्ह्यातील ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या लातूर तालुक्यातील लातूर, बाभळगाव, हरंगुळ, गातेगाव, तांदुळजा, चिंचोली, कन्हेरी, अहमदपूर तालुक्यातील खंडाळी, हाडोळती, निलंगा तालुक्यातील निटूर, रेणापूर तालुक्यातील कारेपूर, पळशी, जळकोट या महसूल मंडळांचा समावेश आहे.

हे देखील पाहा -

कधी नव्हे यंदा शंखी गोगलगायींनी खरीप पिकांवर हल्ला चढविला आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरीप पिकांवर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. या संकटामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना त्यावरील उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. अधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यात ८ जुलैपासून संततधार व अतिवृष्टीला सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेक भागांतील खरिपाची कोवळी पिके पाण्यात गेली.

Latur News
Presidential Election 2022 Results: द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? देशाला आज मिळणार नवे राष्ट्रपती!

शेतकऱ्यांचे खुप मोठे नूकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. त्यानुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आदेश काढून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे व शेतजमिनीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com