विचित्र हवामानामुळे रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी पुन्हा चिंतेत!

अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले असले तरीही सगेटकऱ्याने हार न मानता पुन्हा लागवड केली आहे.
विचित्र हवामानामुळे रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी पुन्हा चिंतेत!
विचित्र हवामानामुळे रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी पुन्हा चिंतेत!गोविंद साळुंके
Published On

गोविंद साळुंके

अहमदनगर: जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. मागास गव्हाच्या पेरणीमुळे जिल्ह्यातील गव्हाचे क्षेत्र दीडशे पट झालेले आहे. तर कांदा पिकाने दीड लाख हेक्टरचा टप्पा ओलांडला असून विचित्र हवामानामुळे जिल्ह्यात सध्या गहू, हरभरा, कांदा, पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत हंगामाच्या सरासरीच्या 6 लाख 70 हजार हेक्‍टर क्षेत्रावर 92 टक्के पेरण्या झालेल्या आहेत.

विचित्र हवामानामुळे रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी पुन्हा चिंतेत!
Republic Day: विकी कौशलचे हे Kurta Looks चढवतील देशभक्तीचा रंग

गेल्या वर्षभरात पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बोर, विहिरींना मुबलक पाणी आहे. अनेक ठिकाणी तळी भरलेले असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात पाण्याची धास्ती न घेता पिके घेतले आहेत. मात्र अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले असले तरीही सगेटकऱ्याने हार न मानता पुन्हा लागवड केली आहे. यावर्षी कांद्याच्या क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हे देखील पहा-

सध्या ढगाळ वातावरण असून विचित्र हवामानामुळे पिकांना वेगवेगळ्या रोगाने ग्रासलेले दिसून येत आहे. मागील आठवड्यात पडलेले धुके आणि अवकाळी पावसामुळे बहुतेक पिकावर रोग पडले आहेत. कांद्याचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सध्या हरभरा पिकावर घाटे अळीचा काही ठिकाणी प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर कांदा पिकावर थीम्स म्हणजे टाक्या या किडीचा प्रादुर्भाव व करपा रोग आढळून येत आहे. तर काही ठिकाणी तांबेरा आणि मावा हा रोग आढळून येत आहे. शेतकऱ्यांनी अवकाळी पावसात हार न मानता कांदा लागवड केली आणि आता या विचित्र हवामानामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात येण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com