कृषी विभाग व मविमच्या संयुक्त विद्यमाने 'रानभाज्या' महोत्सव साजरा

कृषी विभाग व मविमच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला आहे. यारानभाज्या महोत्सवामध्ये विविध रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.
कृषी विभाग व मविमच्या संयुक्त विद्यमाने 'रानभाज्या' महोत्सव साजरा
कृषी विभाग व मविमच्या संयुक्त विद्यमाने 'रानभाज्या' महोत्सव साजरा राजेश काटकर

परभणी : सोनपेठ कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित सर्वोदय लोक साधन केंद्र यांच्या वतीने तालुका स्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन देशमुख कॉम्पलेक्स येथे करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.Organizing taluka level Ranbhaja festival

हे देखील पहा-

या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन तहसीलदार ऐश्वर्या गिरी,Tehsildar Aishwarya Giri प्रगतीशील युवा शेतकरी वैष्णवी देशपांडे, हे उपस्थित होते. या महोत्सवामध्ये तालुक्यात उपलब्ध असलेल्या विविध रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच विक्री करण्यात आली. यावेळी तालुक्यातील डिघोळ येथील बचत गटाच्या महिलांनीwomen विविध भाज्यांचे प्रदर्शनPerformanc भरवले तर कृषी मित्र व महिला शेतकरी यांनी गावरान भाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या तसेच या महोत्सवास मोठ्या संख्येने नागरीकांनी भेट देऊन रानभाज्यांची खरेदी केली.

कृषी विभाग व मविमच्या संयुक्त विद्यमाने 'रानभाज्या' महोत्सव साजरा
महाडमध्ये हिरवळ संस्थेतर्फे आठ हजार पूरग्रस्तांना मदत

तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी रानभाज्यांचे महत्त्व सांगुन अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्या बद्दल आयोजकांचे कौतुक केले तर वैष्णवी देशपांडे हीने शेतकरी कोणत्याही गोष्टीचे उत्पादन घेऊ शकतो पण विक्री करु शकत नाही म्हणुन शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी सक्षम व्यवस्था व असे उपक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. रानभाज्या महोत्सवात मध्ये पथरी, गुळवेल, केणा, टाकला, दिंदा, कुडा, पानाचा ओवा, कपाळ फोडी, भुई आवली, मायाळू, शेवगा, कवट, सीताफळ, अशा विविध ३० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉलStall लावण्यात आले होते.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com